Electric vehicle
Electric vehicle google
विज्ञान-तंत्र

Electric vehicle : प्रत्येक चार्जसोबत मिळवा ९० ते १८० किमीची रेन्ज

नमिता धुरी

मुंबई : आयवूमी एनर्जीने सादर केली आहे जीतएक्स. एक्स्ट्रा पॉवर असलेली ही ई-स्कूटर हाय-स्पीड देणारी असून आरटीओ रजिस्टर्ड आहे. आयवूमी एनर्जीची ही ई-स्कूटर भारतात, भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. ७० केएमपीएच स्पीड देणाऱ्या जीतएक्सला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने प्रमाणित केले आहे.

ही ई-स्कूटर अतिशय टिकाऊ आहे. जीतएक्स आणि जीतएक्स १८० हे दोन प्रकार कंपनी आणणार आहे. इको मोडमध्ये जीतएक्स प्रत्येक चार्जसोबत १०० पेक्षा जास्त किमी रेंज देते तर रायडर मोडमध्ये ९० पेक्षा जास्त किमीची रेंज मिळते. जीतएक्स १८० इको मोडमध्ये २०० पेक्षा जास्त किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये १८० पेक्षा जास्त किमीची रेंज देते. किंमत ९९,९९९ रुपये.

जीतएक्ससोबत ऍक्सेसरी म्हणून ड्युएल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देण्याची देखील घोषणा कंपनीने केली आहे. हे सेटअप त्यांच्या आधीच्या हाय-स्पीड आईवूमी एस१ मॉडेलसोबत आणि इतर लो-स्पीड व्हेरियंट्ससोबत, आयवूमीच्या सर्व ई-स्कूटरची रेंज वाढवण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे त्यांचे सध्याचे युजर्स आपल्या ई-स्कूटरना या ड्युएल बॅटरी कॉन्फिगरेशनसह अपग्रेड करू शकतील.

या घोषणेमुळे ही कंपनी भारतातील पहिली अशी कंपनी बनली आहे जी आपल्या सर्व ई-स्कूटरसोबत ड्युएल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देत आहे. तसेच आईवूमीच्या स्कूटर आधीपासून वापरत असलेल्या युजर्सना त्यांच्या ई-स्कूटरना कोर बॅटरी लेवलपर्यंत अपग्रेड करण्याची संधी दिली जात आहे, पुढील चार्जिंग आणि ऍक्सेसिबिलीटीसाठी याला काढून ठेवले जाऊ शकते.

आयवूमीचे एमडी आणि सह-संस्थापक श्री. सुनील बन्सल म्हणाले, "देशात विकसित करण्यात आलेल्या इनोव्हेशन्ससह आईवूमीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नव्या सुविधा, नवे लाभ आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. भारतातील स्थिती विचारात घेऊन सर्वात चांगली ईव्ही आणण्यासाठी, आपल्या संशोधन व विकासाला सदैव पुढे नेत कंपनी स्टेबिलायजेशन मोडमध्ये आहे. "

कामगिरी आणि किंमतीचे मूल्य या दोन बाबी डोळ्यासमोर ठेवून, परिपूर्णता हे उद्दिष्ट मानून इंजिनीयर करण्यात आलेल्या या ई-स्कूटरमध्ये चालवत असताना मोड सहज स्विच करता यावा यासाठी "ईझी शिफ्ट" सारख्या आधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, सुविधाजनक व सुरक्षित रिव्हर्स गियर्स, अधिक सुरक्षेसाठी कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) असल्याने अचानक ब्रेक लावल्याने उत्पन्न होणारा प्रभाव आणि गाडी थांबण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होतो.

यामध्ये एक टचलेस फूटरेस्ट देखील असते जे न वाकता आणि हातांचा उपयोग न करता देखील बाहेर काढले व आत ढकलले जाऊ शकते. याशिवाय आयवूमी जीतएक्स बॅटरीसोबत ३ वर्षांची वॉरंटी दिली जाते.

सर्वोत्तम, प्रीमियम लुक आणि डिझाईनसह, मोठी ईव्ही सर्व आकार व आकारमानांच्या भारतीयांसाठी उपयुक्त आहे. आयवूमी एनर्जी ही अशा काही मोजक्या ई-स्कूटर उत्पादकांपैकी एक आहे जे प्रत्येक राईडमध्ये १०० पेक्षा जास्त किमीच्या उत्तम रेंजसह एक मोठी बूट स्पेस देतात.

ई-स्कूटरमध्ये चार मॅट रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत - शार्लेट रेड, इंक ब्ल्यू, पॉश व्हाईट आणि स्पेस ग्रे. जीतएक्स जवळच्या आयवूमी डीलरशिपकडे खरेदी करता येईल आणि ग्राहकांनी निवडलेल्या पर्यायांनुसार १ लाख ते १.४ लाख रुपयांपर्यंत तिची किंमत असेल. जीतएक्स सीरिजची बुकिंग १ सप्टेंबरपासून सुरु होत आहे आणि गाडी त्याच तारखेपासून उपलब्ध होईल.

जीतएक्स १८० सप्टेंबरच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल. सर्वात आधी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आयवूमीतर्फे नव्या व्हेरियंटसह १० सप्टेंबर २०२२ पर्यंत ३००० रुपयांच्या ऍक्सेसरीज मोफत दिल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT