Electric Vehicles Surprisingly Cause More Pollution Than Petrol and Diesel Cars esakal
विज्ञान-तंत्र

Car Pollution : इलेक्ट्रीक कार खरंच पर्यावरणपूरक? पेट्रोल अन् डिझेल कारपेक्षा EV करते जास्त प्रदूषण, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Electric Vehicles Surprisingly Cause More Pollution Than Petrol and Diesel Cars : इलेक्ट्रीक वाहनं पर्यावरणपूरक मानली जातात, पण नवीन संशोधनानुसार ती पेट्रोल-डिझेल कारपेक्षा जास्त प्रदूषण करतात. बॅटरी निर्मिती आणि टायर ब्रेकमुळे होणारं उत्सर्जन पर्यावरणाला हानी पोहोचवतं.

Saisimran Ghashi

  • इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी निर्मितीमुळे पेट्रोल-डिझेल कारपेक्षा ४६ पट जास्त कार्बन उत्सर्जन होतं.

  • जड बॅटरीमुळे टायर ब्रेकच्या झिजेतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

  • शहरी भागात धूरमुक्त असले तरी ईव्ही वाहनांचं पर्यावरणीय नुकसान खाणकाम आणि उत्पादनात लपलेलं आहे.

इलेक्ट्रीक वाहनांना पर्यावरणाचा रक्षक मानलं जातं, पण नवीन संशोधनाने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रीक कार (ईव्ही) जास्त प्रदूषणकारी असल्याचा दावा समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पर्यावरण संरक्षणासाठी भारतात ईव्ही वाहनांना प्रोत्साहन दिलं जात असलं, तरी त्यांच्या निर्मितीपासून ते वापरापर्यंतच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत असल्याचं उघड झालं आहे.

ईव्ही आणि इंधनावरील वाहनांच्या निर्मितीत फारसा फरक नसतो; चेसिस, पार्ट्स सारखेच असतात. फरक आहे तो बॅटरी आणि मोटरचा. पण ही बॅटरी बनवण्याची प्रक्रिया पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. संशोधनानुसार, ईव्ही वाहनांचं एकूण कार्बन उत्सर्जन पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत ४६ पट जास्त आहे.

एक ईव्ही कार बनवताना ५ ते १० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन होतं. याचं कारण आहे बॅटरी निर्मिती. एका बॅटरीसाठी ८-१० किलो कोबाल्ट, ३५ किलो मँगनीज आणि ८ किलो लिथियम लागतं. हे खनिज मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम करावं लागतं, ज्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होते. कोबाल्टऐवजी निकेलचा वापर केला जातो, पण त्यासाठीही खाणकाम आवश्यक आहे.

इतकंच नाही, ईव्ही कार बनल्यानंतरही प्रदूषण थांबत नाही. जड बॅटरीमुळे ब्रेक आणि टायर्सची झीज जास्त होते, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल कारपेक्षा १,८५० पट जास्त कणांचं उत्सर्जन होतं, असं एमिशन अॅनालिटिक्सच्या अहवालात म्हटलं आहे. मग ईव्ही कार पर्यावरणपूरक कशा? शहरी भागात त्या धूर सोडत नाहीत, पण प्रदूषण खाणकाम आणि बॅटरी उत्पादनाच्या ठिकाणी होतं. यामुळे ईव्ही खरंच पर्यावरणपूरक आहेत का, हा प्रश्न गंभीर बनला आहे.

FAQs

  1. Do electric vehicles really pollute more than petrol and diesel cars?
    इलेक्ट्रीक वाहनं खरंच पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त प्रदूषण करतात का?

    होय, संशोधनानुसार इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी निर्मितीमुळे आणि टायर-ब्रेकच्या झिजेमुळे पेट्रोल-डिझेल कारपेक्षा ४६ पट जास्त कार्बन उत्सर्जन होतं.

  2. What causes the high pollution from electric vehicles?
    इलेक्ट्रीक वाहनांमुळे होणारं जास्त प्रदूषण कशामुळे होतं?

    बॅटरी बनवण्यासाठी लागणारं खाणकाम आणि त्यातून होणारं कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन, तसंच जड बॅटरीमुळे टायर-ब्रेकची झीज हे मुख्य कारण आहे.

  3. Are electric vehicle batteries harmful to the environment?
    इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी पर्यावरणासाठी हानिकारक आहेत का?

    होय, बॅटरी बनवण्यासाठी कोबाल्ट, लिथियम, मँगनीजसाठी खाणकाम केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते.

  4. How do electric vehicle brakes and tires contribute to pollution?
    इलेक्ट्रीक वाहनांचे ब्रेक आणि टायर प्रदूषणाला कसे हातभार लावतात?

    जड बॅटरीमुळे ब्रेक आणि टायरची झीज जास्त होते, ज्यामुळे १,८५० पट जास्त कणांचं उत्सर्जन होतं.

  5. Are electric vehicles still eco-friendly in cities?
    इलेक्ट्रीक वाहनं शहरी भागात अजूनही पर्यावरणपूरक आहेत का?

    शहरी भागात ती धूर सोडत नाहीत, पण खाणकाम आणि बॅटरी उत्पादनामुळे होणारं प्रदूषण त्यांना पूर्णपणे पर्यावरणपूरक ठरवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Networth: सत्यपाल मलिक यांच्याकडे किती मालमत्ता होती? डोक्यावर होतं कर्ज

Pune Road Potholces : पुण्यात खड्ड्यांचा ‘जिवंत देखावा’; रस्ते दुरूस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Latest Maharashtra News Updates Live : पोंगे व कुरकुरे बनविण्याच्या कंपनीला अचानक लागली आग

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मुख्यमंत्री धामी यांनी तातडीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, दिले आदेश  

CM Devendra Fadnavis: कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले; महत्त्वाचा निर्णय घेत पालिकेला दिले आदेश

SCROLL FOR NEXT