PM Narendra Modi  esakal
विज्ञान-तंत्र

PM Narendra Modi : मोदींना भेटण्यासाठी येतायत इलॉन मस्क; भारतात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता

मागच्या वर्षी जून महिन्यात इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मस्क यांनी म्हटलं होतं की, त्यांनी २०२४ मध्ये भारत दौरा निश्चित केला आहे. सोबतच त्यांनी टेस्ला लवकरच भारतात पाय ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

संतोष कानडे

Elon Musk in India : मागच्या अनेक वर्षांपासून भारतात पाय ठेवण्यासाठी इच्छूक असलेल्या टेस्लाचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने काहीच दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी धोरण निश्चित केलं आहे. त्यातच आता टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतात येत असल्याची बातमी आहे.आपण भारतात पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी जात असल्याचं स्वतः इलॉन मस्क यांनी ट्वीट करुन सांगितलं.

इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क याच महिन्यात भारतात येत आहेत. आपल्या भारत यात्रेदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यामध्ये मस्क हे गुंतवणुकीसंदर्भात घोषणा करु शकतात. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या दौऱ्यामध्ये टेस्ला कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी मस्क यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येऊ शकतात, असंही सांगितलं जातंय.

मागच्या वर्षी जून महिन्यात इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मस्क यांनी म्हटलं होतं की, त्यांनी २०२४ मध्ये भारत दौरा निश्चित केला आहे. सोबतच त्यांनी टेस्ला लवकरच भारतात पाय ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक करण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासू इच्छूक आहे. परंतु टॅक्ससह इतर मुद्द्यांवर वाटाघाट्या प्रलंबित आहेत. मस्क यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारने एक नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण घोषित केलं आहे. त्याअंतर्गत किमान ५०० दशलक्ष गुंतवणुकीसह देशातील कंपन्याना आयात शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT