Twitter  Sakal
विज्ञान-तंत्र

Twitter New CEO : अखेर ट्विटरला मिळाला नवा CEO; मस्ककडून फोटो जारी

ट्विटरची मालकी मिळाल्यापासून मस्क अनेक वादग्रस्त निर्णय घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter New CEO : ट्विटरची मालकी मिळाल्यापासून मस्क अनेक वादग्रस्त निर्णय घेत आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

त्यात गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटरचं CEO पद रिक्त आहे. मात्र, आता या पदावर एका नव्या पाहुण्याची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मस्कने स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे.

ट्वीटरला मिळालेला नवा सीईओ कुणी व्यक्ती नसून एक श्वान असून, CEO पदाच्या खुर्चीतील फोटो मस्कने शेअर केला आहे. हा श्वान मस्कचा पाळीव कुत्रा असून, त्याचे नाव फ्लोकी असे आहे.

फ्लोकीचा फोटो शेअर करताना मस्कने लिहिले आहे की, त्याचा कुत्रा फ्लोकी दुसऱ्या माणसापेक्षा चांगला आहे, येथे मस्कने माजी सीईओ पराग अग्रवाल यांचे नाव जरी घेतलेले नसले तरी, अशी टीका करण्यामागे त्यांचा उद्देश नेमका काय हे समजू शकलेले नाही.

मस्कने काही दिवसांपूर्वी ट्विटर 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले होते. अलीकडेच मस्कने ट्विटरच्या ब्लू टिक्सबद्दल भाष्य केले आहे. यामध्ये फ्रि ब्लू टिक घेणाऱ्या यूजर्सकडून ही सेवा लवकरच काढून घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT