Elon Musk Neuralink eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Neuralink : मानवाच्या मेंदूत बसवण्यात येणार 'कम्प्युटर चिप'! पहिल्या व्यक्तीच्या शोधात इलॉन मस्क

Neuralink Human Test : यावर्षी मे महिन्यामध्ये अमेरिका सरकारने या प्रयोगाची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी दिली होती.

Sudesh

मानवी मेंदूमध्ये कम्प्युटर चिप बसवण्यासाठी इलॉन मस्कची 'न्यूरालिंक' कंपनी गेल्या कित्येक वर्षांपासून संशोधन करत आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये अमेरिका सरकारने या प्रयोगाची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर आता कंपनी यासाठी पेशंटचा शोध घेत आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) मानवी चाचणीला सशर्त परवानगी दिली होती. यामध्ये त्यांनी अशी अट ठेवली होती. की केवळ एमियोट्रोफिक लॅटरल स्क्वेरोसिस (एएलएस) या आजारामुळे लकवाग्रस्त झालेल्या रुग्णांवरच याची चाचणी करण्यात यावी. प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनादेखील अशाच आजाराची लागण झाली होती.

त्यामुळे आता Neuralink कंपनी अशा प्रकारच्या रुग्णांचा शोध घेत आहे. अशा दहा रुग्णांवर प्रयोग करण्याची परवानगी इलॉन मस्कने मागतली आहे. मात्र, एफडीएने किती रुग्णांच्या चाचणीची परवानगी दिली आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

कसा होणार फायदा?

एएलएस आजारामुळे शरीराची हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच विविध प्रकारच्या दिव्यांग्य व्यक्तींना देखील या चिपचा फायदा होईल असं सांगण्यात येत आहे. या चिपच्या माध्यमातून लोक केवळ विचार करुन कम्प्युटर माउस किंवा कीबोर्ड कंट्रोल करू शकणार आहेत. यामुळे अधिक चांगल्या प्रकारे संशोधन करता येणार आहे.

काय आहे न्यूरालिंक?

न्यूरालिंकची स्थापना 2016 साली करण्यात आली होती. ही न्यूरोटेक कंपनी इलॉन मस्कच्याच मालकीची आहे. इम्प्लांटेबल ब्रेन-कम्प्युटर इंटरफेस विकसीत करण्यासाठी ही कंपनी काम करत आहे. मानवी चाचणी पूर्ण करण्यासाठी पुढील सहा वर्षे लागू शकतात असं कंपनीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT