Elon Musk Wikipedia eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Wikipedia : 'विकिपीडियाचं नाव बदला, मी एक बिलियन डॉलर्स देईल', इलॉन मस्कची मोठी ऑफर!

विकिपीडियाचं नाव बदलून डिकिपीडिया ठेवा, असं इलॉन मस्कने म्हटलं आहे.

Sudesh

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे इलॉन मस्क हे आपल्या विचित्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या डोक्यात कधी काय येईल हे सांगता येत नाही. आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ते कित्येक प्रकारच्या पोस्ट करत असतात. आता त्यांची अशीच एक एक्स (ट्विटर) पोस्ट चर्चेत आली आहे.

मस्क यांनी विकिपीडिया या वेबसाईटला तब्बल 1 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. अर्थात, यासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. विकिपीडिया या वेबसाईटने आपलं नाव बदलून 'डिकीपीडिया' असं ठेवलं, तर आपण त्यांना एक अब्ज डॉलर्स देऊ असं मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका वर्षासाठी ठेवावं लागणार नाव

इलॉन मस्कच्या पोस्टनंतर नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं, की विकिपीडियाने ही ऑफर घ्यायला हवी. पैसे मिळाल्यानंतर पुन्हा ते आपलं नाव बदलू शकतात. यावर इलॉन मस्कने आपली अट सांगितली. "किमान एक वर्षापर्यंत त्यांना हे नाव ठेवावं लागणार आहे. मी मूर्ख नाही." असा रिप्लाय मस्कने दिला आहे.

विकिपीडिया हा जगातील सर्वात मोठा मोफत माहितीचा स्त्रोत आहे. हा पूर्णपणे मोफत तर आहेच, शिवाय या वेबसाईटवर जाहिराती देखील नसतात. त्यामुळेच विकिपीडिया ऑपरेट करण्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो. यासाठी कित्येक महिन्यांपासून ही वेबसाईट नेटिझन्सकडून वर्गणी मागत आहे.

याच वेळी इलॉनने दिलेली ऑफर ही पुढील कित्येक वर्षांपर्यंत विकिपीडिया कार्यरत ठेवण्यासाठी पुरेशी असणार आहे. त्यामुळेच कित्येक नेटिझन्स ही ऑफर विकिपीडियाने घ्यावी असं म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT