Musk on Drugs eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk on Drugs : 'एवढी मोठी कंपनी चालवण्यासाठी गरज असतेच', ड्रग्ज घेण्याबद्दल इलॉन मस्कने दिलं स्पष्टीकरण

Don Lemon Elon Musk : पत्रकार डॉन लेमन यांना दिलेल्या एका मुलाखतीत इलॉनने या विषयावर अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्या.

Sudesh

Elon Musk on Ketamine Use : टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. स्पेस-एक्सने असं स्पष्ट केलं होतं की त्यांची नियमित ड्रग चाचणी घेण्यात येते, आणि ते कामावर असताना कधीही नशेत आढळले नाहीत. मात्र आता इलॉन मस्कनेच आपल्या ड्रग्जच्या सवयीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

पत्रकार डॉन लेमन (Don Lemon) यांना दिलेल्या एका मुलाखतीत इलॉनने या विषयावर अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्या. इलॉन यांनी सांगितलं, की "अशी एक वेळ होती जेव्हा मी बऱ्यापैकी डिप्रेशनमध्ये होतो. या नकारात्मक मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला केटामाईनची (Ketamine) भरपूर मदत झाली. मात्र ते घेण्यासाठी माझ्याकडे डॉक्टरचं प्रस्क्रिप्शन होतं."

काम करण्यासाठी असते गरज

"माझ्याकडे भरपूर काम असतं. कधी-कधी दिवसाचे 16 तास मी काम करतो. त्यामुळे आठवड्याला किंवा दोन आठवड्यांना अगदी थोड्या प्रमाणात मी केटामाईन घेतो. जर ते अति प्रमाणात घेतलं तर तुम्हाला काहीच काम करणं शक्य होत नाही. मला काम करायचंच असल्यामुळे जास्त प्रमाणात ते घेणं मला शक्यच नाही." असंही मस्क यांनी स्पष्ट केलं.

पॉट कसा स्मोक करतात?

इलॉन मस्कला मागे 'जो रोगन शो'वर Marijuana स्मोक करताना पाहिलं गेलं होतं. मात्र, आपल्याला अजूनही पॉट कसा स्मोक करतात हे माहिती नसल्याचं मस्कने या मुलाखतीत सांगितलं. यासोबतच आपण कधीही दारू पित नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

आपण जे ड्रग घेतो त्यामुळे सरकारी कंत्राट किंवा गुंतवणुकदारांसोबतचे संबंध यावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास मस्कने यावेळी व्यक्त केला. "माझी कंपनी प्रगती करत आहे, आणि जर त्यासाठी मी काही घेत असेल, तर गुंतवणुकदारांच्या मते मी ते घेतच रहायला हवं.." असं ते म्हणाले.

मस्क यांच्यावर मोठे आरोप

मुलाखतीमध्ये मस्क यांनी डॉक्टर प्रिस्क्राईब्ड ड्रग्जबद्दल खुलेपणाने चर्चा केली आहे. मात्र, मस्कवर आणखीही बरेच ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. LSD, कोकेन, मशरुम्स आणि असे कित्येक ड्रग्ज त्यांनी घेतल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही, तर टेस्लाचे कित्येक उच्च अधिकारी देखील मोठ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Tourism Expo : पर्यटनाचे अनेक पर्याय एकाच छताखाली; ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला पुण्यात आजपासून प्रारंभ

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची निवड

School Bus : ‘विद्यार्थी वाहतूक नियमावली’ कागदावरच! परिवहनमंत्र्यांनी सूचना देऊन वर्ष उलटले, तरी अहवाल गुलदस्तात

ZP Election : निवडणुकीसाठी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ; २३ हजार जणांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT