Elon Musk Robot Video eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Robot : इलॉन मस्कचा रोबोट घालतोय चक्क कपड्यांची घडी ! घरातल्या कामांमध्येही करू लागला मदत.. पाहा व्हिडिओ

Optimus Robot : इलॉन मस्कने गेल्या वर्षी ऑप्टिमस रोबोटच्या सेकंड जनरेशनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये हा रोबोट अगदी मानवाप्रमाणेच चालताना दिसत होता.

Sudesh

Elon Musk Optimus Robot Video : इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीची एक डिव्हिजन ह्यूमॅनॉईड रोबोट्स देखील बनवत आहे. ऑप्टिमस नावाच्या या रोबोट्सना अगदी मानवाप्रमाणे हालचाल करण्यास, आणि घरातली कामं करण्यास शिकवलं जात आहे. मस्कचा हा रोबोट आता चक्क आपल्या कपड्यांची घडी करून देत असल्याचं एका नव्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. (Tesla Robot)

इलॉन मस्कने आपल्या एक्स हँडलवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ऑप्टिमस रोबोट एका बास्केटमधून टी-शर्ट बाहेर काढून, तो टेबलवर अगदी व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. (Optimus Robot Folding Laundry)

इलॉन मस्कने दुसऱ्या एका पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे, की अद्याप हा रोबोट ऑटोमॅटिक पद्धतीने हे काम करू शकत नाही. मात्र, भविष्यात नक्कीच तो स्वतः हे काम करू शकेल. तसंच, भविष्यात हा रोबोट थेट दोरीवर वाळत घातलेले कपडे हातात घेऊन, थेट घडी घालून ठेऊ शकेल. म्हणजेच, त्याला कोणत्याही टेबल किंवा बास्केटची गरज भासणार नाही.

काय-काय करु शकतो ऑप्टिमस?

इलॉन मस्कने गेल्या वर्षी ऑप्टिमस रोबोटच्या सेकंड जनरेशनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये हा रोबोट अगदी मानवाप्रमाणेच चालताना दिसत होता. फर्स्ट जनरेशनपेक्षा या रोबोटचं वजन 10 किलोने कमी केल्याचंही मस्कने स्पष्ट केलं होतं. यामुळे त्याच्या हालचाली आणखी जलद आणि सोप्या झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT