Twitter Blue Subscription Service: एलॉन मस्क यांच्याकडे मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरची मालकी आल्यापासून सर्वाधिक चर्चा व्हेरिफाइड टिकची होत आहे. यूजर्सला पैसे देऊन व्हेरिफाइड टिक खरेदी करता येणार आहे. यासाठी मस्क Twitter Blue सर्व्हिसला री-लाँच करणार आहे.
हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
याबाबतची घोषणा स्वतः मस्क यांनी केली असून, दोन डिसेंबरला या सर्व्हिसला पुन्हा लाँच केले जाईल. ट्विटर ब्लू ही कंपनीची प्रीमियम सबस्क्रिप्शन आधारित सर्व्हिस आहे. या सबस्क्रिप्शनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ट्विटर यूजर्सला वेगवेगळ्या रंगाची टिक (चेक मार्क) मिळणार आहे.
ट्विटरवर कंपन्यांसाठी गोल्ड चेक मार्क, सरकारसाठी ग्रे आणि सर्वसामान्य यूजर्ससाठी ब्लू टिक मार्क जारी केले जाईले. तसेच, सर्व व्हेरिफाइड अकाउंटचे पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. याआधी ट्विटरवर राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सेलिब्रेटींची ओळख पटावी यासाठी ब्लू टिक जारी केले जात असे. Twitter Blue ला पुन्हा सुरू करण्यास उशीर होत असल्याबाबत मस्क यांनी माफी देखील मागितली आहे.
Twitter Blue साठी द्यावे लागणार पैसे
ट्विटर ब्लूसाठी यूजर्सला पैसे द्यावे लागणार आहेत. भारतात ट्विटर ब्लूची किंमत ७२० रुपये असू शकते. अमेरिका व इतर देशांमध्ये यासाठी ८ डॉलर्स मोजावे लागतील. नवीन सर्व्हिस व्यतिरिक्त व्हर्च्यूअल जेलवर देखील काम सुरू आहे. रिपोर्टनुसार, यूजर्सने ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्यास व्हर्च्यूअल जेल होईल. या अंतर्गत यूजर्सला प्लॅटफॉर्मवर कोणतीही अॅक्टिव्हिटी करावी लागणार नाही.
बॅन अकाउंट पुन्हा करणार सुरू
मस्क यांच्याकडे मालकी आल्यापासून बॅन करण्यात आलेले अनेक ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. कंपनीने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा सुरू केले आहे. यासाठी मस्क यांनी पोल देखील होता व अनेक यूजर्सनी अकाउंट सुरू करण्यासाठी मत दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.