Elon Musk Sakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk: इलॉन मस्क राजकारणात एंट्री करणार? पोल घेत म्हणाले...

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी उघडपणे रिपब्लिकन नेत्याला पाठिंबा दिल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. मस्क यांनी याबाबत पोल देखील घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Elon Musk Twitter poll: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ट्विटरला खरेदी करण्यापासून ते कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापर्यंत, ते आपल्या निर्णयाने अनेकांना धक्का देत आहेत. याशिवाय, मस्क आपल्या पोलमुळे देखील चर्चेत आहेत. आता त्यांनी राजकारणापासून लांब राहावे की नाही, याबाबत एक पोल घेतला आहे.

मस्क यांनी अमेरिकेतील राजकीय नेते Kevin McCarthy यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले होते. ट्विटरचा वापर राजकीय नेत्याच्या समर्थनार्थ केल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता त्यांनी एक पोल घेत राजकारणापासून लांब राहावे की स्वतःचे नुकसान करत राहावे, असा प्रश्न विचारत यूजर्सचे मत मागितले आहे. याबाबत बहुतांश यूजर्सने दुसऱ्या पर्यायाच्या बाजूने मत देत मस्क यांनी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्यावे, असे म्हटले आहे.

हेही वाचा: Twitter: मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा लीक; तुमचे अकाउंट असेल तर सावधान

याशिवाय, मस्क यांनी स्वतःचे २०१३ चे एक ट्विट देखील पुन्हा शेअर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राजकीय गोष्टींवर भाष्य करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, हे ट्विट पुन्हा शेअर करत काही सवयी मोडणे कठीण असल्याचे म्हटले आहे.

मस्क यांनी उघडपणे रिपब्लिकन नेते केव्हिन मॅकार्थी यांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केव्हिन हे यूएस हाउस स्पीकरच्या पदासाठी निवडणूक लढवत आहेत.

काही दिवसांपूर्वीच घेतला होता आणखी एक पोल

मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरचे सीईओपद सोडावे की नाही, यासंदर्भात पोल घेतला होता. या पोलवर बहुतांश यूजर्सने मस्क यांनी पद सोडावे, या बाजूने मत दिले होते. मात्र, या पोलनंतर देखील मस्क हे आपल्या पदावर कायम आहेत.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT