ISRO Scientist eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Scientist : भारताला अंतराळात नेणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांची व्यथा, स्पेस सेंटरवरील कर्मचाऱ्यांसाठी नाहीत पुरेशा रेल्वे - रिपोर्ट

SDSC-SHAR : सुल्लुरुपेटा स्टेशनवर अधिक रेल्वे थांबाव्यात अशी मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Sudesh

चांद्रयान, मंगळयान, आदित्य अशा कित्येक मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने भारताची मान जगात उंचावली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, सतीश धवन स्पेस सेंटर याठिकाणी काम करत असणाऱ्या वैज्ञानिकांनी कित्येक रॉकेट आणि उपग्रह अंतराळात पाठवले आहेत.

मात्र, याच वैज्ञानिकांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा रेल्वे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. सतीश धवन स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी सुल्लुरुपेटा स्टेशनवर उतरणं गरजेचं आहे. मात्र याठिकाणी कित्येक रेल्वे थांबत नाहीत. त्यामुळे याठिकाणी अधिक रेल्वे थांबाव्यात अशी मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांना पत्र लिहीत याबाबत मागणी केली आहे. सिंग हे इस्रोचे मिनिस्टर-इन-चार्ज आहेत. WION या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कुठे आहे स्पेस सेंटर?

भारतातून होणारी कित्येक अंतराळ प्रक्षेपणे ही सतीश धवन स्पेस सेंटरवरुन होतात. चेन्नईपासून सुमारे 100 किलोमीटर दूर असणाऱ्या श्रीहरीकोटा या निर्जन बेटावर हे सेंटर आहे. या ठिकाणाहून सर्वात जवळचं रेल्वे स्थानक सुल्लुरुपेटा हे आहे. हेदेखील स्पेस स्टेशनपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

"सुल्लुरुपेटा रेल्वे स्टेशन हे SDSC-SHAR याठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि श्री-सिटीमधील लोकांसाठी एक महत्त्वाचं स्टेशन आहे. मात्र, याठिकाणी पुरेशा रेल्वे थांबत नसल्यामुळे इथल्या सर्व नागरिकांना आपल्या घरी किंवा गावी जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे." असं कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

यामुळे, राज्यमंत्र्यांनी हे प्रकरण संबंधित मंत्रालयाकडे नेऊन, सुल्लुरुपेटा या स्थानकावर लांब पल्ल्याच्या अधिक रेल्वे थांबाव्यात यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात केली आहे. यासोबत कर्मचाऱ्यांनी काही रेल्वे गाड्यांची यादी देखील दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! 'अतिवृष्टी-पूरग्रस्तांसाठी पूर्व विदर्भासाठी ३४० कोटी मंजूर'; रक्कम जमा होणार..

Karnataka Sugar Season : महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू...

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

Kolhapur Sex Worker : कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली, प्रकरणातील नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT