Gleeden
Gleeden 
विज्ञान-तंत्र

कोरोनात एक्स्ट्रा मॅरिटल App वर भारतीयांच्या उड्या; ओलांडला 13 लाखांचा टप्पा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ग्लीडेन (Gleeden) या विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी असलेल्या डेटिंग अॅपची कोरोना महामारीच्या काळात चांगलीच चांदी झाल्याचं दिसतंय. कोरोना काळात भारतीय यूझर्सने या अॅपवर तब्बल 13 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ग्लीडेनने मंगळवारी यासंबंधीचा डेटा शेअर केला आहे. 

गेल्या तीन महिन्यामध्ये ग्लीडेन अॅपने सब्सक्रिप्शनच्या बाबतीत उंचाक गाठला. सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्यात भारतामध्ये सब्सक्रिप्शनची संख्या तुफान वेगाने वाढली. या तीन महिन्यात सब्सक्रिप्शनमध्ये 246 टक्क्यांची वाढ झाल्याने कंपनीने सांगितले आहे. गेल्या चार महिन्यात तीन लाखांपेक्षा अधिक सब्सक्रायबर्स भारतामधून जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यातच 2.5 लाख नवे सब्सक्रायबर्स जोडले गेले आहेत. 

'मारी'भाईची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Avengersच्या टीमबरोबर करणार काम

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांना घरीच राहणे बंधनकारण झाले होते. त्यामुळे 2019 च्या तुलनेत अॅपवर वेळ घालवण्याचे प्रमाण 2020 मध्ये तिप्पट पटीने वाढले आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हर्चुअल पद्धतीने भेटणे पसंद केले. ग्लीडेन डेटिंग अॅपला देशात मान्यता मिळाली असल्याचे कंपनीचे भारतातील प्रमुख सायबील शिन्डेल Sybil Shiddell यांनी म्हटलं आहे. 

एकट्या बंगळूरमध्ये ग्लीडनचे 16.2 टक्के युझर्स आहेत. मुंबईत या अॅपचे 15.6 टक्के यूझर्स आहेत. दिल्ली तिसऱ्या स्थानावर असून राजधानीत 15.4 टक्के यूझर्स आहेत. ग्लीडन कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार यूरोपीयन नागरिकांपेक्षा भारतीय जवळजवळ साडेतीन तास जास्त या अॅपवर घालतात. अॅपवर भेटण्याची वेळ 10 ते 12 जास्त आहे. कोरोनाच्या काळात कंपनीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT