Facebook esakal
विज्ञान-तंत्र

Facebook : फेसबुकमध्येही जेंडर गॅप ! महिलांना मिळतो पुरुषांपेक्षा कमी पगार

हल्ली सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत

सकाळ डिजिटल टीम

Facebook : हल्ली सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असल्या, तरी वेतनाच्या बाबतीत विषमता असल्याचे दिसून आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील महिला नोकरदारांचे वेतन पुरुष नोकरदारांच्या तुलनेत सरासरी १९ टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे.

'मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स'नुसार (एमएसआय) देशात अद्याप 'जेंडर पे गॅप' असल्याचे आढळून आले असून, पुरुष नोकरदार महिला नोकरदारांच्या तुलनेत ताशी ४६.१९ रुपये अधिक सरासरी वेतन घेत असल्याचे दिसून आले आहे.

आता हे फक्त भारतातच आहे असं नाही बरं का! तर अमेरिकन टेक कंपनी मेटा म्हणजेच पूर्वीची Facebook, आपल्या महिला कर्मचाऱ्यांना आयर्लंड आणि यूकेमधील पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार देते.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेली मेटा पगार देताना महिलांशी भेदभाव करत असल्याचं समोर आलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटा पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना कमी पगार आणि बोनस देते.

महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो

तासिका कामगार असो वा पूर्णवेळ कर्मचारी, यूके किंवा आयर्लंडमध्ये मेटासाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जातो. आयर्लंडमधील मेटा ऑफिसमध्ये 3,000 महिला आणि यूकेमध्ये 5,000 महिला काम करत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. हे त्याच्या जागतिक कर्मचार्‍यांपैकी सुमारे 10 टक्के आहे.

बोनसमध्येही भेदभाव

गेल्या वर्षी कंपनीत महिलांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा 15.7 टक्के कमी वेतन मिळाले होते. सरासरी बोनसबद्दल बोलायचे तर हा फरक आणखी जास्त आहे कारण देशातील महिलांना पुरुषांपेक्षा 43.3 टक्के कमी बोनस मिळतो.

यूकेमध्येही वाईट परिस्थिती आहे

ब्रिटनबद्दल बोलायचे झाले तर आयर्लंडच्या तुलनेत पगारात कमी फरक आहे. मात्र, येथेही महिलांबाबत भेदभाव केला जातो. 2021 च्या वेतन डेटाचा हवाला देत 2022 च्या अहवालानुसार, यूकेमध्ये महिलांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा 2.1 टक्के कमी वेतन दिले जाते. येथे बोनसचे अंतरही मोठे आहे, कारण महिलांना पुरुषांपेक्षा 34.8 टक्के कमी बोनस मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT