Technology Tips : देशातील मंदिरं होतायत टेक-सॅव्ही, आरतीपासून प्रसादापर्यंत सर्व काही ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Technologyb Tips

Technology Tips : देशातील मंदिरं होतायत टेक-सॅव्ही, आरतीपासून प्रसादापर्यंत सर्व काही ऑनलाइन

Technologyb Tips : टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलते आहे असं नाही तर पूर्वीपेक्षा वेगाने प्रगती सुरू आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी कुठे नाहीये, तर सगळीकडे आहे. अगदी देवाच्या गाभाऱ्यात देखील टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. विशेष म्हणजे देशातील या मोठमोठ्या मंदिरांचे स्वतचे मोबाईल ॲप आहेत. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या ॲपच्या माध्यमातून तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता. एवढंच काय तर या अॅपद्वारे दर्शन पास आणि आरती बुकिंग आणि प्रसाद इत्यादी गोष्टी खरेदी करता येऊ शकता.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर

प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या या अॅपच नाव श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. याच्या माध्यामतून तुम्ही थेट दर्शन (मंदिराच्या वेळेनुसार) करू शकता. अॅपद्वारे मंदिराला देणगी देऊ शकता. सध्या या ॲपवर पर्सनाइलज्ड पूजा बुकिंगचा ऑप्शन नाहीये. पण तुम्ही मंदिराच्या वेबसाइटवरून हे सुध्दा बुक करू शकता.

श्री काशी विश्वनाथ मंदिर

श्री काशी विश्वनाथ मंदिर अॅपद्वारे भाविक रुद्राभिषेक, आरती, महादेव पूजा आणि सुगम दर्शन हे ऑप्शन बुक करू शकतात. अॅपद्वारे आरती बुक केल्यानंतर मंदिरात प्रवेश करण्यासाठी युजरला एसएमएस आणि ईमेलद्वारे टोकन क्रमांक मिळेल. आरतीसाठी भाविक स्वतःची वेळही निवडू शकतात. अॅपद्वारे आरतीचं थेट दर्शनही करता येतं, आरतीसाठी बुकिंगसाठी भक्तांनी साइन-अप करणं आवश्यक आहे.

साईबाबा मंदिर शिर्डी

श्री साईबाबा संस्थान शिर्डी अॅपद्वारे भक्तांना आरती, दर्शन पास आणि मुक्कामासाठी बुकिंग करता येईल. या सर्व गोष्टींच्या बुकिंगसाठी, युजरला अॅपमध्ये साइन-अप करावं लागेल.

श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन या अॅपवर मंदिराच्या वेळेत लाईव्ह दर्शन घेण्याव्यतिरिक्त तुम्ही भस्मार्ती आणि राहण्यासाठी रूम देखील बुक करू शकता. याशिवाय तुम्ही अॅपच्या माध्यमातून दानही देऊ शकता. आरती बुकिंगसाठी फोटो आणि आयडी प्रूफ अपलोड करावा लागेल.

तिरुमला तिरुपती देवस्थानम

या ॲपच नाव TTDevasthanams असं आहे. या अॅपद्वारे तुम्ही स्पेशल एन्ट्री पास आणि राहण्यासाठी बुकिंग करू शकता. या अॅपवर तुम्ही मंदिर हुंडीसाठी दान देऊ शकता आणि सप्तगीती मासिकासाठी मेंबरशीप देखील खरेदी करू शकता. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला अॅपमध्ये लॉग इन करावं लागेल.

सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर

हे ॲप तामिळ, इंग्रजी आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये राहण्यासाठी रूम, पार्किंग, डेली शेड्युल, सण आणि इमरजेंसी फोन नंबर संबंधित माहिती मिळेल.

कनक दुर्गा मंदिर

कनक दुर्गा मंदिर अॅप फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपद्वारे सेवा आणि दर्शनासाठी बुकिंग करता येईल. यासोबतच तुम्ही या अॅपद्वारे देणगी देखील देऊ शकता, तुम्ही मंदिराशी संबंधित पुस्तके आणि इतर गोष्टी अॅपद्वारे खरेदी करू शकता.

शिव ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन मंदिर

Srisaila Devasthanam Temple अॅपच्या माध्यमातून तुम्ही दर्शन, पूजा, सेवा, अभिषेक आणि मुक्कामासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा घेऊ शकता. या अॅपमध्ये मंदिराचे ठिकाण आणि इव्हेंटची माहिती देण्यात येते. या अॅपद्वारे भाविक देणगीही देऊ शकतात.

पेरिंगोट्टुकरा देवस्थानम श्री विष्णुमाया मंदिर

पेरिंगोट्टुकारा देवस्थानम हे भगवान कुट्टीचाथन किंवा भगवान श्री विष्णुमाया यांना समर्पित मंदिर आहे. हे भारतातील सर्वात मोठ मंदिर आहे. या अॅपवर भक्तगण आरतीसाठी बुकींग करू शकतात, भक्तीशी संबंधित गाणी आणि व्हिडिओ डाउनलोड करू शकतो.

सोमनाथ मंदिर

सोमनाथ यात्रा अॅपवर भाविकांना सोमनाथ मंदिराविषयी सविस्तर माहिती देण्यात आलीय. या अॅपद्वारे तुम्ही प्रसाद खरेदी करू शकता आणि मंदिराशी संबंधित पुस्तके आणि इतर धार्मिक गोष्टी खरेदी करू शकता.