“Australia enforces a strict ban on Facebook and Instagram for users under 16 as Meta initiates mass account blocking to enhance child online safety.”

 

esakal

विज्ञान-तंत्र

Facebook, Instagram ban for Children : १६ वर्षांखालील मुलांना ‘फेसबुक’,‘इंस्टा’वर बंदी ; जाणून घ्या, कोणत्या सरकारने घेतला निर्णय?

Facebook and Instagram for users under 16 : ‘Meta’ने तब्बल ५ लाख अकाउंट ब्लॉक करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Facebook and Instagram Access Blocked for Children in Australia : ऑस्ट्रेलिया  सरकारने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या देशाने १६ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, इंस्टावर बंदी आणली आहे. या पार्श्वभूमीवर आता टेक जायंट Metaने  देखील १६ वर्षांखालील सर्व युर्जर्सना इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून काढून टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई ऑस्ट्रेलियाच्या नवीन सोशल मीडिया धोरणाअंतर्गत केली जात आहे, जी १० डिसेंबरपासून लागू होणार आहे. 

कंपनीने अलिकडेच केलेल्या मोठ्या प्रमाणात वय पडताळणीत १६ वर्षांखालील युजर्सचे सुमारे पाच लाख अकाउंट आढळले. या अकाउंटना आता लॉकआउट नोटीस पाठवण्यात आली आहे आणि १० डिसेंबरपर्यंत ते प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे काढून टाकले जातील. तर Messenger अॅप या बंदीमध्ये समाविष्ट नाही असे मेटाने स्पष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयानंतर मेटाने १६ वर्षांखालील युजर्सना शक्य तितक्या लवकर पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि खासगी संदेशांसह त्यांचा डेटा डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. मेटाने म्हटले आहे की, "लवकरच तुम्ही फेसबुक वापरू शकणार नाही आणि तुमचे प्रोफाइल तुम्हाला किंवा इतरांना दिसणार नाही." याचबरोबर कंपनीने या युजर्सना त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करण्यासही सांगितले जेणेकरून ते १६ वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

Meta ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय संचालक विल ईस्टन म्हणाले की, हे पाऊल आव्हानात्मक आहे. मात्र परंतु कंपनीचे ध्येय तरुणांना सुरक्षित ऑनलाइन अनुभव प्रदान करणे आहे. आम्ही सरकारच्या ध्येयाशी सहमत आहोत, जरी संपूर्ण बंदी आपल्यासोबत काही आव्हाने घेऊन येत असली, तरीही, आम्ही सुरक्षित आणि संतुलित डिजिटल वातावरणाच्या समर्थनार्थ काम करत राहू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'किती पैसे पाहिजेत?' धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनावेळी सनी देओल पापाराझींवर संतापला, म्हणाला...

MSEDCL Protest : महावितरण कार्यालयासमोर ‘ठिय्या’; किन्ही-बहिरोबावाडीला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

2026 Calendar : Gemini Nano वर बनवा तुमच्या फोटोचा स्पेशल 2026 कॅलेंडर; 10 सेकंदात होईल तयार, हे घ्या 5 बेस्ट प्रॉम्प्ट

समाजवादी चळवळीतील प्रेरणास्रोत

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर सात हजारांहून अधिक हरकती

SCROLL FOR NEXT