Facebook Blue Tick esakal
विज्ञान-तंत्र

Facebook Blue Tick : फेसबुकच्या ब्लू टीकसाठीसुद्धा मोजावे लागणार पैसे, मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Facebook Blue Tick : आता पर्यंत ट्विटर हँडलवर ब्लू टीकसाठी पैसे मोजावे लागणार म्हणून यूजर्स आक्रमक झाले होते. मात्र आता मार्क झुकरबर्गच्या फेसबुकबाबतच्या मोठ्या घोषणेनंतर आता फेसबुक यूजर्सनाही धक्का बसला आहे. होय, आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठीसुद्धा पैसे मोजावे लागणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे.

सध्या या प्रीमियम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशातही सुरुवात होईल. (Facebook)वेबसाठी त्याची किंमत 11.99 डॉलर्स आणि ioS साठी त्याची किंमत 14.99 डॉलर्स (1241रुपये) एवढी असणार आहे.

ट्विटरने नुकतीच त्याची ट्विटर ब्लू पेड सबस्क्रिप्शन सेवा लाँच केली आहे. त्यासाठी दरमहा यूजर्सना पेड सबस्क्रिप्शन प्लान घ्यायचा असल्यास 900 रुपये मोजावे लागतील. तर सगळ्यात कमी सबस्क्रिप्शन प्लान हा 650 रुपयांचा असून हा फक्त वेबसाठीच असणार आहे. आता ट्विटरनंतर फेसबुकसुद्धा सेवा पेड करण्यावर भर देताना दिसतेय. फेसबुकचा प्रीमियम प्लान हा ट्विटरपेक्षाही महागडा असल्याचे दिसते.

फेसबुकच्या ब्लू टीकबाबत काही घोषणा लवकरच जाहीर होतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होतीच. मात्र मेटा टीम यावर बऱ्याच काळापासून संशोधन करत होती. अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अखेर मार्कने फेसबुकच्या ब्लू टीकबाबत ही मोठी घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT