Facebook uses artificial intelligence to step up suicide prevention 
विज्ञान-तंत्र

"लाईव्ह' आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचा पुढाकार 

सकाळवृत्तसेवा

"आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा वापर करणार 

मुंबई : फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. त्यासाठी फेसबुकने एक टीमही सज्ज ठेवली आहे. 
फेसबुकने "क्रायसिस सपोर्ट ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून "मॅसेंजर लाईव्ह चॅट'ची सेवा उपलब्ध केली आहे; मात्र फेसबुक लाईव्हवर काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकने हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 
एखादा वापरकर्ता फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळल्यास त्याच्या मित्रांना त्याबाबत "ऍलर्ट' करणे या तंत्रज्ञानामुळे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची माहिती देणाऱ्यांना फेसबुककडून मदतही देण्यात येणार आहे. फेसबुकने त्यासाठी एक व्हिडीओ कॅम्पेनही लॉंच केले आहे. मशीनच्या माध्यमातूनही अशा पोस्ट शोधून काढण्याची प्रणालीही फेसबुकने विकसित केली आहे. वापरकर्त्यांची मोठी संख्या पाहता अधिकाधिक संस्थांनाही या उपक्रमाशी जोडून घेण्याचा फेसबुकचा मानस आहे. 
जगभरात प्रत्येक सेकंदाला सरासरी 42 आत्महत्या होतात. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 29 या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: संसद मार्गावरील निषेध प्रकरणातील आंदोलक न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT