Family Cars esakal
विज्ञान-तंत्र

Family Cars : मोठ्या कुटुंबासाठी 'या' कार आहेत बेस्ट ऑप्शन

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की लोक सुट्टीसाठी गावी तसंच वेगवेगळ्या ठिकाणी भटकंतीसाठी निघतात

सकाळ डिजिटल टीम

Family Cars : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की लोक सुट्टीसाठी गावी तसंच वेगवेगळ्या ठिकाणी भटकंतीसाठी निघतात. बहुतेक लोक हे आता स्वत:च्याच कारमध्ये प्रवास करण्यास अधिक प्राधान्य देतात. त्यात ज्या लोकांचे कुटुंब ५ ते ७ लोकांचे आहे त्यांना मोठी ७ सीटर कारच अधिक कम्फरटेबल असते.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी मोठी SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही खास ऑप्शन्स सांगणार आहोत. यामध्ये मारुती सुझुकी आणि किया केरेन्सपासून टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरपर्यंत अशाच १० दमदार कार्सचा समावेश आहे. ज्या तुम्ही विकत घेऊन संपूर्ण कुटुंबासह आरामात लांबचा प्रवास करू शकता..

Maruti Suzuki Ertiga

मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक परवडणारी ७ सीटर कार आहे, या कारची सुरुवातीची किंमत अर्थात एक्स-शोरूम किंमत ८.६४ लाख रुपये आहे आणि तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत ८ लाख रुपये आहे. ही कार सीएनजी पर्यायातही उपलब्ध आहे.

Kia Carens

Kia Motors Cars देखील मागील काही काळांपासून तुफान विकल्या जात आहेत. दरम्यान किआ कंपनीची Kia Carens ही एक लोकप्रिय ७ सीटर कार आहे. या कारची किंमत १०.४५ लाख रुपये असून ही एक्स-शोरूम किंमत आहे. तर टॉप व्हेरियंटसाठी १८.९५ लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.

Mahindra Scorpio-N

Mahindra & Mahindra ची शक्तिशाली आणि सदाबहार SUV Mahindra Scorpio-N हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत १३.०५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २४.५२ लाख रुपयांपर्यंत याचं टॉप मॉडेल जातं. ही एसयूव्ही ६ आणि ७ सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये आहे.

Toyota Fortuner

मागील काही काळात एक रॉयल कार म्हणून समोर आलेली टोयोटा फॉर्च्युनर ही एक शक्तिशाली एसयूव्ही आहे, याची एक्स-शोरूम किंमत ३२.५९ लाख ते ५०.३४ लाख रुपये इतकी आहे. फॉर्च्युनरने एसयूव्ही सेगमेंटमध्ये मजबूत स्थान निर्माण केले आहे आणि त्याच्या स्पर्धेत सध्या कोणतीच कार नाही.

MG Hector Plus

मोठ्या फॅमिली कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी MG Hector Plus हा देखील एक चांगला पर्याय आहे. हेक्टर प्लसची एक्स-शोरूम किंमत १८ लाख ते २२.९९ लाख रुपये आहे. ही एसयूव्ही 6 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये आहे.

Kia Carnival

लक्झरी MPV कार म्हणून ही किया कार्निव्हल एक भारी ऑप्शन आहे. हीची प्राईसही कारप्रमाणे दमदार आहे. याची एक्स-शोरूम किंमत ३०.९९ लाख रुपये ते ३४.३९ लाख रुपये इतकी आहे. ही MPV ७, ८ आणि ९ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update:शरद पवारांचा माध्यमांशी संवाद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT