SMS Sakal
विज्ञान-तंत्र

World's first SMS: कोणी पाठवला होता जगातील पहिला SMS? 'या' मेसेजमध्ये नक्की काय होते? पाहा डिटेल्स

३० वर्षांपूर्वी जगातील पहिला एसएमएस सेंड करण्यात आला होता. १९९२ मध्ये पहिल्यांदाच पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

World First Text Message: सध्याच्या काळात स्मार्टफोनच्या एका क्लिकवर जगात कोणाशीही सहज संपर्क साधता येतो. कॉलिंग, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहज कोणाशीही संपर्क साधणे शक्य आहे. अनेकदा आपण कॉल करण्याऐवजी मेसेजच्या माध्यमातून संवाद साधत असतो. इंटरनेट स्वस्तात उपलब्ध होण्याआधी SMS पॅकचा वेगळा रिचार्ज करावा लागत असे. यामुळे कमी किंमतीत सहज कोणालाही मेसेज पाठवता येत असे. परंतु, जगातील सर्वात पहिला मेसेज कोणी पाठवला होता? हे तुम्हाला माहितीये का?

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

जवळपास ३० वर्षांपूर्वी ३ डिसेंबर १९९२ ला जगातील पहिला मेसेज पाठविण्यात आला होता. हा मेसेज वोडाफोनचे इंजिनिअर नील पापवोर्थ यांनी आपल्या कॉम्प्युटरवरून सहकारी रिचर्ड जार्विस यांना पाठवला होता. रिचर्ड हे त्यावेळी कंपनीचे संचालक होते. त्यांनी हा मेसेज ऑर्बिटल ९०१ हँडसेटवर पाठवला होता. पाठवण्यात आलेला हा पहिला मेसेज देखील खास होता. या मेसेजमध्ये मेरी ख्रिसमस लिहित नील पापवोर्थ यांनी रिचर्ड यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

या मेसेजमध्ये १४ अक्षरं होती. जगातील हा पहिला वहिला मेसेज वोडाफोनद्वारे पाठवण्यात आला होता. त्याआधी वर्ष १९८४ मध्ये फ्रेडेलम हिलरब्रँड आणि बर्नार्ड घिलेबर्ट यांनी एसएमएसची संकल्पना मांडली होती.

कसे काम करते SMS टेक्नोलॉजी?

SMS टेक्नोलॉजी शब्दांना एल्क्ट्रिकल सिग्लनमध्ये बदलून जवळील टॉवरला पाठवते. त्यानंतर तो मेसेज एसएमएस सेंटरवर पोहचता. पुढे रिसिव्हरच्या जवळील टॉवरवर हा मेसेज पोहचतो. अखेरच्या टप्प्यात टॉवर रिसिव्हरच्या डिव्हाइसवर मेसेज सेंड करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT