Brain Chip Implant Neuralink Elon Musk  
विज्ञान-तंत्र

Brain Chip Implant: इलॉन मस्कच्या 'न्यूरालिंक'ने पहिल्यांदाच रुग्णाच्या डोक्यात बसवली चिप, मानवी चाचणीला सुरुवात

Brain Chip Implant Neuralink Elon Musk : जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे, न्यूरोलिंक कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे, न्यूरोलिंक कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भातील माहिती दिली आहे. एका मानवी रुग्ण्याच्या मेंदूमध्ये पहिल्यांदाच चीप बसवण्यात आली असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले आहेत.( first human patient received an implant from brain chip startup Neuralink company billionaire founder Elon Musk said)

न्यूरॉन्स हे असे सेल्स असतात जे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करुन मेंदू आणि शरीरात माहिती पोहोचवत असतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मागील वर्षी न्यूरालिंक कंपनीला चिप मेंदूमध्ये बसवण्याचा प्रयोग करण्याची परवानगी दिली होती.त्यानंतर सप्टेंबरमध्ये न्यूरालिंकने सांगितलं होतं की, एका पॅरालिसिस झालेल्या रग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली आहे.

ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस brain-computer interface (BCI) मेंदूच्या एका विशिष्ठ भागात बसवण्यात येते. हालचाल करण्यासाठी सिग्नल देणाऱ्या सेल्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा प्राथमिक उद्देश हा आपल्या विचारांचा वापर करुन कॉम्युटर कर्सर किंवा किबोर्डचा वापर फक्त करता यावा हा आहे.

मस्क यांनी यासंदर्भातील एका दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, न्यूरालिंकच्या पहिल्या उत्पादनाला टेलीपाथी म्हटलं जाईल. यासंदर्भातील अधिक माहिती देण्यास न्यूरालिंकने तुर्तास नकार दिला आहे. मात्र, न्यूरालिंकच्या या प्रयोगामुळे नव्या क्रांतीची मुहूर्तवेढ रोवली गेल्याची चर्चा आहे. खासकरुन शरीर निकामी झालेल्या किंवा पॅरोलेसिस झालेल्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Baby Elephant Viral Video: चिखलात उड्या, मस्ती अन् मजा! हत्तींच्या पिल्लांचा मजेदार व्हिडिओ पाहून दिवस बनेल खास

Nashik Mahapalika Nivadnuk: नाशिक महापालिकेचा गड कोण जिंकणार? दोन ठाकरे, भाजप की शिंदे? भविष्यासाठी निर्णायक असलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT