Flipkart
Flipkart Sale
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale: सुरू होतोय फ्लिपकार्टचा भन्नाट सेल, टीव्ही-फ्रिज निम्म्या किंमतीत; iPhone खूपच स्वस्तात

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Big Saving Days Sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लवकरच नवीन सेलला सुरुवात होणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Big Saving Days Sale सुरू होणार आहे.

या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि टीव्हीसह इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. फ्लिपकार्ट प्लस यूजर्ससाठी हा सेल एकदिवस आधीच सुरू होईल.

१५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सेलचा फायदा २० जानेवारीपर्यंत घेता येईल. या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बँक डिस्काउंटचा मिळेल फायदा

सेलमध्ये ICICI Bank आणि Citi बँकेच्या कार्ड्सवर आकर्षक ऑफर आहे. या दोन्ही बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा फायदा घेतल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल.

याशिवाय, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के डिस्काउंट मिळेल. ग्राहक Flipkart Pay Later चा देखील फायदा घेऊ शकतात.

स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

Flipkart सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्सला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने सर्व ऑफर्सची माहिती अद्याप दिलेली नाही. परंतु, सेलमध्ये तुम्ही iPhone ला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. iPhone 14 आणि iPhone 14 Plus ला खूपच स्वस्तात खरेदी करता येईल.

हेही वाचा: Auto Expo 2023 : ऑटो एक्स्पोत सादर झाली Kia EV9 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV; जाणून घ्या डिटेल्स

आयफोनसोबतच Samsung Galaxy Z Flip 3 वर देखील बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल.

सेलमध्ये ९९९ रुपये सुरुवाती किंमतीत साउंडबार उपलब्ध आहेत. तर १५,९९० रुपये सुरुवाती किंमतीत लॅपटॉप्स मिळतील.

बेस्ट सेलिंग इयरफोन्सला तुम्ही ५९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, अवघ्या १,२९९ रुपये सुरुवाती किंमतीत स्मार्टवॉच मिळेल.

७५ टक्के डिस्काउंटचा मिळेल फायदा

टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना तुम्ही ७५ टक्के डिस्काउंटसह घरी घेऊन जाऊ शकता. याशिवाय, टीव्हीवर ६५ टक्के आणि रेफ्रिजरेटरवर ६५ टक्के डिस्काउंटचा फादा मिळेल.

किचन अ‍ॅप्लायन्स २९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल. तर २९९ रुपये वॉशिंग मशीनवर ५५ टक्के सूट मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT