Flipkart Sale Cooler Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale : उन्हाळ्याच्या तोंडावर फ्लिपकार्टची भेट; 'एसी' अन् कूलरवर 50 टक्क्यांहून अधिक सूट.. जाणून घ्या ऑफर्स

Offers on Cooler : तुम्ही जर कूलर घेण्याचा विचार करत असाल; तर फ्लिपकार्टवर बजाज, हिंदवेअर, व्होल्टास, क्रॉम्प्टन, ओरिएंट आणि सिम्फनी अशा मोठ्या ब्रँड्सच्या कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे.

Sudesh

Flipkart Big Upgrade Sale Offers on Cooler and AC : यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही एसी किंवा कूलर घेण्याचा विचार करत असाल, तर हीच चांगली संधी आहे. कारण फ्लिपकार्टवर सध्या या दोन्ही गोष्टींवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

फ्लिपकार्टवर 9 मार्चपासून बिग अपग्रेड सेल ( Flipkart Big Upgrade Sale) सुरू झाला आहे. 15 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कित्येक प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट देण्यात येत आहे. यातील काही कूलर आणि एसीच्या ऑफर्सबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांच्या कूलर आणि एसीचा समावेश आहे.

कूलर

तुम्ही जर कूलर (Flipkart Cooler Offers) घेण्याचा विचार करत असाल; तर फ्लिपकार्टवर बजाज, हिंदवेअर, व्होल्टास, क्रॉम्प्टन, ओरिएंट आणि सिम्फनी अशा मोठ्या ब्रँड्सच्या कूलरवर मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. यातील Hindware 45L Room/Personal Air Cooler या कूलरवर 57% डिस्काउंट उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 13,990 रुपये आहे, मात्र फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा केवळ 5,999 रुपयांना मिळत आहे. या कूलरला 4 स्टार रेटिंग मिळाली आहे.

बजाजच्या 24L एअर कूलरवर 35% डिस्काउंट मिळत आहे. याची मूळ किंमत 7,360 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा कूलर केवळ 4,749 रुपयांना उपलब्ध आहे. तर Bajaj 36L एअर कूलरची मूळ किंमत 9,990 रुपये असून, सेलमध्ये 39% डिस्काउंटनंतर हा केवळ 5,999 रुपयांना मिळतो आहे.

Voltas 36L Air Cooler वर तब्बल 48% डिस्काउंट मिळत आहे. याची मूळ किंमत 11,390 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा केवळ 5,899 रुपयांना मिळतो आहे. तर Crompton 40L Air Cooler देखील 34% डिस्काउंट नंतर 6,199 रुपयांना मिळतो आहे. Orient Electric 46L कूलरवर तब्बल 45 टक्क्यांचा डिस्काउंट मिळतो आहे. यामुळे 10,990 रुपये किंमतीचा हा कूलर अवघ्या 5,999 रुपयांना मिळतोय.

एसी

तुम्ही जर एसी घेण्याचा विचार करत असाल; तर गोदरेज, LG, ब्लू स्टार, व्होल्टास आणि सॅमसंग अशा मोठ्या कंपन्यांच्या एसीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. (Flipkart AC Offers)

LG AI Convertible 6-in-1 Cooling या 1.5 टन एसीवर तब्बल 52% डिस्काउंट उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 78,990 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा केवळ 37,490 रुपयांना मिळतो आहे.

Voltas 2023 Model 0.6 Ton या 2 Star स्प्लिट एसीवर देखील 55% डिस्काउंट मिळत आहे. 49,690 रुपये किंमतीचा हा एसी फ्लिपकार्टवर केवळ 21,990 रुपयांना मिळत आहे. लहान घरासाठी हा एसी चांगला पर्याय ठरू शकतो. व्होल्टासचा 1.5 टन 3 Star एसीदेखील 49% डिस्काउंटसह केवळ 32,990 रुपयांना उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त गोदरेजच्या कन्व्हर्टिबल आणि इतर एसींवर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. एरवी साधारणपणे 50 हजारांच्या घरात किंमती असणारे हे एसी फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये मिळत आहेत. तर सॅमसंगच्या एसींवर देखील 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. (Samsung AC Offers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT