esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Loan : लेने के देने पड गए! फ्लिपकार्टवर झाला मोठा फ्रॉड; लोन घेणाऱ्या गरीब माणसाने गमावले 87 हजार रुपये, वाचा नेमकं प्रकरण

Flipkart Loan Fraud : एका व्यक्तीने फ्लिपकार्ट अ‍ॅपवर कर्ज घेण्यासाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्याच्या खात्यातून 87 हजार रुपयांची फसवणुक झाली. हे नेमके काय प्रकरण आहे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी.

Saisimran Ghashi

Flipkart Loan Scam : लुधियानातील एका पोस्टमास्तरला कर्जासाठी अर्ज करताना 87,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकार Flipkart अ‍ॅपद्वारे घडला असून, कर्ज घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला आहे.

फसवणुकीचा प्रकार कसा घडला?

सुधार भागातील कैले गावात राहणाऱ्या सरबजीत सिंग यांनी Flipkart अ‍ॅपच्या माध्यमातून 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी, 4 डिसेंबर रोजी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला Flipkart चा प्रतिनिधी असल्याचे सांगितले व कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र, KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे कर्ज वितरीत होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.

सरबजीत यांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करून फॉर्म भरायला सांगण्यात आले. तसेच, फक्त 5 रुपयांचा टोकन पेमेंट करण्याचा सल्ला दिला. सरबजीत यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले, मात्र त्यांच्या खात्यातून 5 रुपयांऐवजी तब्बल 86,998 रुपये कापले गेले. घडलेल्या प्रकारामुळे सरबजीत चकित झाले आणि त्यांनी त्वरित फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद करण्यात आला.

पोलिसांत तक्रार दाखल

घटनेनंतर सरबजीत यांनी जगरांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण सायबर क्राइम विभागाकडे पाठवण्यात आले असून, संबंधित खात्यांचा तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) जगरोप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या या प्रकरणावर भारतीय दंड संहिता कलम 318(4) व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?

सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

1. अनोळखी कॉल्स किंवा संशयास्पद लिंक्सवर विश्वास ठेवू नका.

2. कोणत्याही प्रकारच्या KYC प्रक्रियेसाठी अधिकृत स्त्रोतांची पडताळणी करा.

3. कधीही वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका.

4. अधिकृत बँकिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सद्वारेच व्यवहार करा.

5. कर्ज घेण्यासाठी अधिकृत बँकांशी संपर्क साधा, थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर टाळा.

सावधगिरीने वागणे आणि फसवणुकीचे प्रकार ओळखणे, हे सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT