flipkart offer on iphone se 2020 half in price for 15498 rupees check features and offer details  
विज्ञान-तंत्र

iPhone SE (2020) वर बंपर ऑफर! अर्ध्याहून कमी किमतीत करा खरेदी

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही देखील आयफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरु शकते. कारण सध्या iPhone SE (2020) आता सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तुम्हाला परवडणारा Apple फोन चा एक्सपिरिएंस घ्यायचा असेल, तर iPhone SE (2020) 64GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 15,498 रुपयांना उपलब्ध आहे.

हा फोन तुम्हाला कमी किंमतीत फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. सध्या फोनवर अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, त्यानंतर त्याची किंमत खूपच कमी झाली आहे. Apple 8 मार्च रोजी एक सार्वजनिक कार्यक्रम घेणार आहे ज्यामध्ये कंपनी iPhone SE 3 सादर करेल. iPhone SE (2020) वर ही डिस्काउंट या कार्यक्रमापूर्वीच जारी करण्यात आला आहे. याशिवाय या कार्यक्रमात आणखी अनेक प्रॉडक्ट्स लाँच केली जाऊ शकतात.

iPhone SE (2020) किंमत, ऑफर

iPhone SE (2020) 64GB मॉडेलची मूळ किंमत फ्लिपकार्टवर 30,298 रुपये आहे परंतु, आता तुम्ही हा फोन 15,498 रुपयांमध्ये घेऊ शकता. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला iPhone SE 2020 वर 14,800 रुपयांची सूट मिळू शकते. तुम्हाला तुमच्या फोनची संपूर्ण एक्सचेंज किंमत मिळाल्यास, iPhone SE 2020 ची किंमत 15,498 रुपये असेल. याशिवाय, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे फोनवर 5% कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. पेटीएम वॉलेटमधून पेमेंट केल्यावर फ्लॅट रु.50 कॅशबॅक देखील लागू आहे.

iPhone SE (2020) चे स्पेसिफिकेशन्स

iPhone SE (2020) मध्ये 4.7-इंचाचा रेटिना HD IPS LCD डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 750x1,334 पिक्सेल आहे. यात 12-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आहे ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन उपलब्ध आहे. तसेच ते 60fps वर 4K रेकॉर्डिंग करू शकता. फोनमध्ये Apple चा A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 7 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच हा फोन IP67 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येते. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो. अॅपलचा हा परवडणारा फोन ब्लॅक, व्हाइट आणि प्रॉडक्ट रेड कलरमध्ये खरेदी करता येईल.

आधी सांगितल्याप्रमाणे, Apple आपल्या आगामी इव्हेंटमध्ये अनेक प्रॉडक्टसोबत iPhone SE 3 देखील लॉन्च करू शकते. हा एक व्हर्च्युअर कार्यक्रम असेल जो 8 मार्च रोजी नियोजित केला गेला आहे. 2022 साठी कंपनीचा हा पहिला सार्वजनिक इव्हेंट असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरील हल्ला हा राजकीय कट; अवैध धंदेवाल्यांवर आरोप

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT