Realme C30
Realme C30 Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: फक्त 5 हजारात मिळतोय 5000mAh बॅटरीसह येणारा पॉवरफुल स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

Offer On Realme C30 Smartphone: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Year End Sale सेल सुरू आहे. फ्लिपकार्टच्या या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये Realme C30 स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे. परंतु, ऑफर अंतर्गत फक्त ५,२४९ रुपयात खरेदी करता येईल. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme C30 स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

Realme C30 स्मार्टफोनवरील ऑफर एअरटेल प्रीपेडसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एवढेच नाही तर यावर ४,७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

Realme C30 चे फीचर्स

Realme C30 मध्ये ६.५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉचसह येतो. यात ८-कोर १२nm Unisoc T६१२ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. यात ३ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत UFS२.२ स्टोरेज मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता.

फोन अँड्राइड ११ वर आधारित रियलमी यूआय गो एडिशनवर काम करतो. यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंगसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ४जी, ३जी, २जी, जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ओटीजी सारखे फीचर्स मिळतील.

रियलमीच्या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी व व्हीडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

हेही वाचा: Recharge Plans: ३०० रुपयात महिनाभर सुरू राहील मोबाइल नंबर, अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचाही फायदा; पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT