Car
Car Sakal
विज्ञान-तंत्र

Used Cars: जुनी गाडी विकायचीये? 'या' महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्यास मिळतील दुप्पट पैसे

सकाळ डिजिटल टीम

Sell Used Cars Online: तुम्ही जर जुन्या कारची विक्री करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या चांगल्या किंमतीत जुनी गाडी विकू शकता. परंतु, यासाठी गाडी लिस्टिंग करण्यापासून ते विकताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही Olx, Car 24, Spinny सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर जुन्या कारची विक्री करू शकता.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

गाडीची संपूर्ण माहिती द्या

जुन्या गाडीची विक्री करण्यासाठी Olx, Car 24, Spinny सारख्या वेबसाइटवर अकाउंट बनवावे लागेल. या साइट्सवर लॉग इन केल्यानंतर गाडीची संपूर्ण माहिती भरा. तुम्हाला वाहन मालकाचे नाव, चेसिस नंबर, आरसी, सर्व्हिस हिस्ट्री इत्यादी माहिती द्यावी लागेल.

योग्य किंमत

माहिती भरल्यानंतर तुम्हाला गाडीची किंमत सांगावी लागेल. तुम्हाला काही ऑफर्स देखील मिळतील. या ऑफर्स अ‍ॅप्लाय केल्यास गाडीची ट्रू वॅल्यू समजेल. तुम्हाला जर ती किंमत मान्य असल्यास गाडी विकण्यासाठी होकार देऊ शकता. यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

घरून होईल पिकअप

गाडी विकण्यासाठी अर्ज केल्यास तुम्हाला एक ठराविक वेळ सांगितली जाईल. या वेळेत एजेंट तुमच्या घरी येऊन गाडी पिक करेल. लक्षात घ्या की गाडी विकताना जी माहिती तुम्ही दिली आहे, त्यासंबंधी कागदपत्रं देखील तुमच्याकडे असतील. जेणेकरून, एजेंट कार पिक करायला आल्यावर कागदपत्रं दाखवता येतील.

गाडीची किंमत होऊ शकते कमी

अनेकदा आपण गाडीच्या विक्रीसाठी एक विशिष्ट किंमत सांगत असतो. परंतु, ग्राहक अथवा एजेंट गाडी खरेदी करण्यास आल्यावर काही त्रुटी निघू शकतात व यामुळे तुमच्या वाहनाची किंमत कमी होईल. तुमच्यासोबत असे होऊ नये यासाठी गाडीची अचूक माहिती द्यावी. याशिवाय, गाडीची किंमत निश्चित करताना आरसी ट्रान्सफरचा खर्च कोण करणार हे देखील ठरावा. अन्यथा गाडीची विक्री करताना तुम्हाला जास्त फायदा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT