Car Sakal
विज्ञान-तंत्र

Car price hike: नववर्षात कार खरेदी करण्याचा विचार आहे? खिशावर पडणार अतिरिक्त भार, कंपन्यांचा मोठा निर्णय

नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. भारतातील प्रमुख कार कंपन्यांनी वाहनांची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cars to get costlier from January 2023: नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. भारतातील प्रमुख कार कंपन्यांनी वाहनांची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. जानेवारी २०२३ पासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्सपासून ते ऑडी या कंपन्यांनी गाड्यांची किंमत वाढवली आहे. कंपन्यांचा दावा आहे की, उत्पादनाच्या खर्चात वाढ व नवीन उत्सर्जन नियमामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मारुती सुझुकी

जानेवारी २०२३ पासून मारुती सुझुकी कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. सध्या कंपनीच्या ऑल्टो, ऑल्टो के10, इग्निस, वॅगनआर, सेलेरियो, एस-प्रेसो, स्विफ्ट, ईको, डिझायर, ब्रेझा, सियाज, अर्टिगा, एक्सएल6 आणि ग्रँड विटारा या गाड्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्स

Tata Motors ने आपल्या संपूर्ण रेंजची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वाहनांच्या किंमतीत २ टक्क्यांनी वाढ होईल.

होंडा कार्स आणि ह्युंडाई इंडिया

होंडाने आपल्या गाड्यांच्या किंमतीत ३० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉडेलनुसार किंमत वेगवेगळी असेल. तसेच, ह्युंडाईने देखील जानेवारी २०२३ पासून गाड्यांच्या किंमतीत वाढ करत असल्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

किआ इंडिया आणि ऑडी

किआच्या कार्स खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. कंपनी भारतात Seltos, Sonet आणि Carens सारख्या लोकप्रिय गाड्यांची विक्री करते. ऑडीने देखील गाड्यांची किंमत १.७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मर्सिडीज-बेंझ आणि जीप इंडिया

१ जानेवारी २०२३ पासून मर्सिडीज-बेंझ आणि जीप इंडियाच्या गाड्या खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. मर्सिडीज बेंझने ५ टक्क्यांपर्यंत तर जीप इंडियाने ४ टक्यांपर्यंत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेनो आणि एमजी मोटर

रेनो इंडिया देखील कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. मात्र, ही वाढ नक्की किती असेल याची कंपनीने माहिती दिलेली नाही. तर एमजी मोटर ३ टक्क्यांनी गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे.

हेही वाचा: Twitter Update: जानेवारी २०२३ मध्ये इलॉन मस्क देणार मोठे गिफ्ट, ट्विटरवर येणार 'हे' खास फीचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT