Online Betting Apps and Games eSakal
विज्ञान-तंत्र

Online Gaming : एकमेकां सहाय्य करू... बेटिंग गेम्सवर बंदी, मात्र गेमर्स लढवतायत वेगळीच शक्कल! जाणून घ्या सविस्तर

Online Betting Apps : कित्येक गेमर्स बेटिंग गेम्स आणि अ‍ॅप्सवर अकाउंट सुरू करण्यासाठी दुसऱ्या राज्यातील मित्रांची मदत घेत असल्याचं समोर आलं आहे.

Sudesh

Real-Money Betting Games India : देशातील कित्येक राज्यांनी आपापल्या क्षेत्रात ऑनलाईन बेटिंग गेम्स आणि अ‍ॅप्सवर बंदी लागू केली आहे. यामध्ये तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अन्य काही राज्यांचा समावेश आहे. मात्र या बंदीतही कित्येक गेमर्स सरकारला गंडवण्याचे विविध मार्ग शोधत आहेत. अगदी साध्या लूडो गेमवर देखील पैसे लावण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली जात असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाईन बेटिंगला आळा घालण्याच्या उद्देशाने कित्येक राज्यांनी खऱ्या पैशांनी खेळल्या जाणाऱ्या गेम्सवर बंदी लागू केली आहे. मात्र गेमर्स आता साध्या गेम्सवर देखील पैसे लावताना दिसत आहेत. यासाठी ते व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम ग्रुप्सची मदत घेत आहेत. यातील काही ग्रुप्समध्ये तब्बल 16 हजार मेंबर्स असल्याचं देखील समोर आलं आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ऑनलाईन ग्रुप्स

बेटिंग अ‍ॅप्सवर बंदी असली, तरी कित्येक राज्यांमध्ये साध्या गेम्सवर बंदी नाही. त्यामुळे कित्येक गेमर्स पैशांचा व्यवहार नसणारे ऑनलाईन गेम्स खेळत आहेत. अर्थात, यामध्ये पैशांचा व्यवहार करण्यासाठी ते व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम ग्रुप्सची मदत घेत आहेत. लुडो, पोकर, रमी अशा गेम्स खेळून, ग्रुप्सवर त्यावर बेटिंग लावली जात आहे. Ludo King Betting Group India असं नाव असलेल्या एका टेलिग्राम ग्रुपमध्ये तर तब्बल 16,121 सदस्य असल्याचं समोर आलं आहे. (Online Gaming)

अशाच प्रकारचे मित्रांचे, कुटुंबीयांचे किंवा अगदी अनोळखी व्यक्तींचे देखील ग्रुप्स तयार केले जात आहेत. गेममध्ये पैशांची देवाण-घेवाण शक्य नसली, तरी या ग्रुप्सवर बेट लावून पैशांचे व्यवहार होत आहेत. काही लोक तर अशा प्रकारच्या गेम टूर्नामेंटचे आयोजन करून पैसे देखील कमवत असल्याचं समोर आलं आहे.

व्हीपीएनचा वापर

भारतातील कित्येक राज्यांमध्ये जिओब्लॉकिंग फीचर वापरण्यात येत आहे. त्यामुळे ठराविक राज्यातून ठराविक गेम्सना अ‍ॅक्सेसच मिळत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास तेलंगणामधून ड्रीम11 हे फॅन्टसी गेमिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा पर्यायच उपलब्ध होत नाही.

यावर पर्याय म्हणून कित्येक यूजर्स व्हीपीएनचा वापर करतात. यामुळे यूजरची लोकेशन त्या कालावधीपुरती बदलली जाते. कित्येक यूजर्स शेजारची राज्ये किंवा थेट दुसऱ्या देशांमधील लोकेशनचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. (Tech News)

दुसऱ्या राज्यातील मित्रांची मदत

कित्येक गेमर्स बेटिंग गेम्स आणि अ‍ॅप्सवर अकाउंट सुरू करण्यासाठी दुसऱ्या राज्यातील मित्रांची मदत घेत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा गेमिंगला बंदी नाही. त्यामुळे ज्याठिकाणी बंदी आहे त्या राज्यातील गेमर्स महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील पत्ता असणाऱ्या गेमर्सच्या नावाने रजिस्ट्रेशन करून KYC पूर्ण करुन घेत आहेत. यानंतर ते लॉग-इन डीटेल्स वापरुन बेटिंग गेम्स खेळता येत आहेत.

चीनमधील अ‍ॅप्सना फायदा

जिओब्लॉकिंग फीचर्सबाबत भारतीय गेम कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे राज्यांनी लागू केलेल्या बंदीचा भारतीय अ‍ॅप्सना तोटा होतो. दुसरीकडे बाहेरील देशांमधील गेम्समध्ये अशा प्रकारचं ब्लॉकिंग फीचर नसतं. त्या गेम्स जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून खेळता येतात. यामुळेच भारतातील मोठा वर्ग भारतीय अ‍ॅप्सना पर्याय म्हणून बाहेरील अ‍ॅप्सची निवड करत आहेत. याचा फायदा चीन आणि इतर देशांतील कंपन्यांना होत असल्याचं मत एका तज्ज्ञाने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Campaign : यायला-जायला वाहन, अन् रोजच्या रोज पैसे बी! महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रॅलीतील शेतमजूर महिलांना रोजगार

Weekly Love Horoscope 12 to 18 January 2026: शुक्र मकर राशीत प्रवेश करताच ‘या’ लोकांच्या लव्ह लाईफमध्ये वाढणार गोडवा

Makar Sankranti 2026: संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण का आणि कसं घालतात? वाचा यामागचं खरं कारण

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Nashik Zilla Parishad : बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले; नाशिक जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचाऱ्यांची मुंबईत होणार तपासणी

SCROLL FOR NEXT