Railway General Ticket  esakal
विज्ञान-तंत्र

Railway: 'या' ट्रेन्समध्ये जनरल तिकीट पुन्हा होणार सुरु; रेल्वेचा मोठा निर्णय

Indian Railway General Ticket: तब्बल दोन वर्षांनंतर काही ट्रेनमध्ये जनरल तिकीटावर प्रवास करता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway General Ticket: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रेल्वेप्रवासावर अनेक बंधनं आली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेप्रवासावर पूर्णपणे बंदी घातली गेली होती. नंतर टप्प्याटप्प्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर देशातील विविध मार्गांवर काही स्पेशल ट्रेन (Train) सुरु करण्यात आल्या. कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. केवळ ज्यांनी सीट आरक्षित (Reservation) केली आहे, अशांनाच फक्त रेल्वे प्रवास करता येत होता. परंतु भारतातील कोरोनाची लाट ओसरली असून जनजीवन पुर्वपदावर येत आहेत. सर्वच ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अशातच आता रेल्वेच्या काही विशिष्ट ट्रेनमध्ये जनरल तिकीट सुरु करण्यात येणार आहे. (General tickets will resume in these trains; The big decision of the railways)

30 जूननंतर विशिष्ट रुटवरील ट्रेनमध्ये जनरल तिकीट सुरु करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घातला आहे. फरीदाबाद-बलवल ते दिल्ली दरम्यान तसेच फिरोजपूर, मुरादाबाद, लखनऊ आणि अंबाला कांट या मार्गावर धावणाऱ्या तब्बल 256 मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकिट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

या रेल्वेमध्ये जनरल तिकिट होणार सुरु-

तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. याबाबत उत्तर रेल्वेच्या पाचही विभागांना रेल्वे बोर्डाने सुचना दिल्या आहेत. इंदोर इंटरसिटी एक्सप्रेस, अमृतसर इंदोर एक्सप्रेस ,कटरा जबलपूर एक्सप्रेस, उत्कल एक्स्प्रेस, पश्चिम एक्सप्रेस, देहराडून एक्सप्रेस, हरिद्वार – बांद्रा एक्सप्रेस, छत्तीसगढ एक्सप्रेस, कटरा एक्सप्रेस, फरादनगर पास, मालवा एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, उज्जयिनी एक्स्प्रेस, गोल्डन टेंपल एक्स्प्रेस, ताज एक्सप्रेस या एक्सप्रेसमध्ये जनरल तिकीट सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ महादेव कोळी समाजाचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT