jio esakal
विज्ञान-तंत्र

रिलायन्स Jio चे सर्वांत स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत बंपर डेटा

रिलायन्स जिओचे सर्वांत स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत मिळवा बंपर डेटा

सकाळ वृत्तसेवा

Airtel आणि Vi च्या तुलनेत Jio प्लॅन्स किंचित स्वस्त तसेच परवडणारे आहेत. कारण हे प्लॅन्स कमी पैशात अनेक उत्तम सेवा देतात.

Reliance Jio ने या महिन्यात आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या (Prepaid Recharge Plan) किमती वाढवल्या आहेत. Airtel आणि Vi च्या तुलनेत Jio प्लॅन्स किंचित स्वस्त तसेच परवडणारे आहेत. कारण हे प्लॅन्स कमी पैशात अनेक उत्तम सेवा देतात. जिओकडे प्रीपेड प्लॅन्सची लांबलचक यादी आहे, ज्यामुळे ग्राहकांना स्वतःसाठी योग्य प्लॅन शोधणे कठीण जाते. अशा परिस्थितीत, जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे अनेक फायदे घेऊन येतात.

Jio चा सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन 155 रुपयांचा आहे जो डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, SMS आणि Jio Cinema, Jio TV, Jio Cloud यासह ऍप्सच्या Jio सूटपर्यंत प्रवेश देते. एअरटेल आणि Vi च्या 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आहे.

जिओच्या 155 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

JioPhone च्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB इंटरनेट, मोफत अमर्यादित कॉलिंग, 300 SMS ची सुविधा आहे. डेटा वापरल्यानंतर वेग 64 kbps होतो. या प्लॅनमध्ये Jio Cinema, Jio TV आणि बरेच काही समाविष्ट आहेत. ज्यांना मर्यादित डेटाची चिंता आहे त्यांच्यासाठी Jio 15 रुपयांपासून सुरू होणारे डेटा ऍड-ऑन व्हाउचर ऑफर करते, जे वापरकर्ते त्यांना अतिरिक्त डेटाची आवश्‍यकता असल्यास डेटा ऍड-ऑन प्लॅनसह रिचार्ज करू शकतात.

जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

जिओचा सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन 299 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps स्पीडने चालते. या प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा देण्यात आला आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये JioCinema, JioSecurity, JioTV आणि JioCloud वर मोफत एक्‍सेस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT