Meta Verified Esakal
विज्ञान-तंत्र

Meta Verified : आता फेसबुक-इन्स्टाच्या व्हेरिफिकेशनसाठी लागणार 699 रुपये; जुन्या अकाउंट्सचं काय होणार?

व्हेरिफाईड यूजर्सना मेटा काही विशेष फायदे देणार आहे.

Sudesh

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर यूजर्सना व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं जाहीर केलं होतं. अशाच प्रकारचा निर्णय काही दिवसांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानेही अशाच प्रकारचा निर्णय जाहीर केला होता. मेटाच्या या सबस्क्रिप्शन प्लॅनची अधिक माहिती आता समोर आली आहे.

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या व्हेरिफिकेशनसाठी 699 रुपये प्रति महिना एवढे चार्जेस द्यावे लागणार आहेत. व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचं खोटं अकाउंट तयार करुन होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. तसंच, व्हेरिफाईड व्यक्तींना अकाउंट सपोर्टदेखील देण्यात येणार आहे.

असा होणार फायदा

मेटाने सांगितलं, की व्हेरिफाईड यूजर्सना काही फायदे देखील होणार आहेत. व्हेरिफाय झालेल्या अकाउंट्सचा कंटेंट अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. लोकांच्या फीड, सर्च रिझल्ट आणि कमेंट्समध्ये व्हेरिफाईड अकाउंट्स दिसण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. तसेच, स्टोरी आणि रील्सवर अशा यूजर्सना एक्सक्लुझिव स्टिकर्स मिळणार आहेत.

या गोष्टींची गरज

तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत. यासाठी तुमचं वय 18 वर्षे पूर्ण हवं. तुमच्याकडे एखादं सरकारी आयडी हवं. तुम्हाला जे अकाउंट व्हेरिफाय करुन हवं आहे त्याचं नाव आणि तुमच्या आयडीवरील नाव मॅच व्हायला हवं. तसंच, तुमच्या फेसबुक किंवा इन्स्टा अकाउंटवर यापूर्वी काही पोस्ट असायला हव्यात.

तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या आयडीसोबतच, एक सेल्फी व्हिडिओ देखील द्यावा लागणार आहे. एकदा तुमचं अकाउंट व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही त्यावरील नाव आणि जन्मतारीख बदलू शकणार नाही. बदलण्याची गरज भासल्यास तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

जुन्या अकाउंट्सचं काय?

ट्विटरने व्हेरिफिकेशनसाठी पैशांची अट सुरू केल्यानंतर आधीच्या सर्व व्हेरिफाईड अकाउंट्सचे बॅज काढून घेतले होते. मात्र, मेटा असं काही करणार नसल्याची माहिती मार्क झुकरबर्गने दिली आहे. सबस्क्रिप्शन सुरू होण्यापूर्वी जे अकाउंट्स व्हेरिफाय झाले आहेत, त्या सर्वांचे बॅज तसेच राहणार आहेत.

स्वस्त प्लॅन येणार

दरम्यान, मेटा लवकरच आपल्या यूजर्सच्या व्हेरिफिकेशनसाठी आणखी एक स्वस्तातला प्लॅन देखील लाँच करणार आहे. वेब व्हर्जनसाठी हा प्लॅन असणार आहे. याची किंमत 599 रुपये प्रति महिना एवढी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT