Google Bard AI eSakal
विज्ञान-तंत्र

Google Bard : गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध; मिळाले नवीन फीचर्स

यूजर्स आता आपल्याला मिळणारी उत्तरं कस्टमाईझ करू शकतील.

Sudesh

गुगलने काही दिवसांपूर्वी आपला एआय चॅटबॉट लाँच केला होता. यामध्ये आता टप्प्या-टप्प्याने अपडेट्स येत आहेत. या अपडेट्सच्या माध्यमातून यात नवीन फीचर्स आणि अधिक भाषा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे हे अधिक प्रभावी एआय टूल होत आहे.

काय आहे बार्ड?

बार्ड (Bard AI) हे गुगलचं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल आहे. हे भाषांशी संबंधित एक टूल आहे, ज्यामध्ये टेक्स्ट कंटेंट तयार करता येतो, तसेच तो विविध भाषांमध्ये ट्रान्सलेटही करता येतो. विविध प्रकारचा कंटेंट लिहिण्याची क्षमता या एआय टूलमध्ये आहे. तसंच, चॅटजीपीटी प्रमाणे तो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतो.

बार्ड यूजर्सना माहिती देण्यासाठी LaMDa च्या लाईट व्हर्जनचा वापर करतो. गुगलवर उपलब्ध माहितीमधून तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधून तो तुम्हाला देतो. भारतासह सुमारे २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये बार्ड उपलब्ध आहे. (Google AI Bard)

४० भाषांचा सपोर्ट

बार्ड हे सध्या ४० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती गुगलने दिली आहे. यामध्ये हिंदी, बंगाली, मँडरीन (चिनी), क्रोएशियन, डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, जपानी, कोरियन, पोलिश, रशियन, स्पॅनिश यांसह इतर भाषांचा समावेश आहे. यासोबतच बार्डमध्ये आठ मोठ्या भाषांमध्ये टेक्स्ट-टू-स्पीच सुविधा देखील उपलब्ध आहे.

उत्तरांचे कस्टमायझेशन

बार्डमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये एक फीचर म्हणजे यूजर्स आता आपल्याला मिळणारी उत्तरं कस्टमाईझ करू शकतील. सिंपल, लाँग, शॉर्ट, प्रोफेशनल किंवा कॅज्युअल अशा पाच विविध प्रकारची उत्तरं यूजर्स मिळवू शकतात. हे फीचर सध्या केवळ इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे. मात्र, लवकरच इतर भाषांमध्येही असं फीचर लाँच करण्याची योजना असल्याचं बार्डने स्पष्ट केलं.

ऐकता येणार उत्तरं

बार्डने दिलेली उत्तरं आता यूजर्सना केवळ वाचता नाही, तर ऐकताही येणार आहेत. लिसन टू रिस्पॉन्स असं या फीचरचं नाव आहे. यासाठी यूजर्सना केवळ साऊंड आयकॉनवर क्लिक करायचं आहे. हे फीचर देखील सध्या केवळ इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT