Google AI esakal
विज्ञान-तंत्र

Google AI : ChatGPT ला सडेतोड उत्तर देणार गुगलचे AI; या तारखेला होणार धमाका!

प्रतिक्षा संपली, लवकरच होणार घोषणा!

सकाळ डिजिटल टीम

 चॅट जीपीटीने बाजारात खूप लोकप्रियता मिळवली असून ते टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली होती. यामुळेच ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जोडणार आहे. कंपनी ८ फेब्रुवारीला सर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित एका कार्यक्रमात याची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच याबद्दल भाष्य केले होते. पचाई म्हणाले होते की, लवकरच लोक सर्वात शक्तिशाली मॉडेलच्या मदतीने शोध घेऊ शकतील. त्यावर काम सुरू असून लोकांना लवकरच हा अनुभव घेता येईल.

The Verge च्या ताज्या रिपोर्टनुसार, Google 8 फेब्रुवारी रोजी सर्च आणि AI शी संबंधित कार्यक्रम आयोजित करणार आहे. या रिपोर्टमध्ये या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशनही शेअर करण्यात आलं आहे. ज्यात माहिती देण्यात आली आहे की, या पॉवरफुल AI च्या मदतीने लोक जलद गतीने कोणतीही गोष्ट सर्च करून काही सेकंदातच हवी असलेली माहिती मिळू शकतात. The Verge मध्ये पाठवण्यात आलेल्या इन्व्हिटेशननुसार, 40 मिनिटांचा हा कार्यक्रम 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ET  (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजत ) YouTube वर प्रसारित केला जाईल.

कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत माहिती देण्यात आली आहे की AI चा वापर करून लोक सर्चिंग अधिक जलद गतीने करू शकतील. गुगल आपल्या अॅपमध्ये आणखी काही टूल्स देखील सादर करणार आहे. ज्यामुळे लोक गुगलकडे पुन्हा ओढले जातील. कारण, लॉन्च झाल्यापासून ChatGPT चे नाव इंटरनेटच्या जगात खूप चर्चेत आहे. त्याचे युजर्स सध्या कोटींच्या घरात आहेत. एका महिन्यातच ChatGpt च्या वापरकर्त्यांची संख्या 10 करोड झाली होती.  हे गुगलसाठी धोकादायक ठरू शकते.

काय आहे ChatGPT

हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचे पूर्ण नाव Generative Pretrained Transformer आहे. तुम्ही याला आधुनिक न्यूरल नेटवर्क आधारित मशीन लर्निंग मॉडेल (Neural network based machine learning model) असेही म्हणू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे रिअल टाईम सर्च तर देतेच शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात देतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT