Google Chrome Hackers eSakal
विज्ञान-तंत्र

Google Chrome : आता हॅकर्सना टक्कर देण्यासाठी गुगलच घेणार पुढाकार; क्रोममध्ये येणार नवीन फीचर

गुगल सध्या वेगाने नवनवीन फीचर्सवर काम करत आहे. क्रोम ब्राऊजरमध्ये जेमिनी एआयचे फीचर्सही लवकरच येणार आहेत, असं कंपनीच्या सीईओंनी स्पष्ट केलं आहे.

Sudesh

Google Safety Feature Update : सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढत असताना, हॅकिंगपासून बचाव होणं गरजेचं आहे. गुगलच्या क्रोम (Google Chrome) या ब्राऊजरवर यासाठी सेफ्टी चेक नावाचं फीचर देण्यात आलं आहे. सध्या हे फीचर मॅन्युअली सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आता नवीन अपडेटनुसार हे फीचर आपोआप काम करणार आहे.

यापूर्वी क्रोमचं सेफ्टी फीचर (Safety Feature) हे आपल्याला सेटिंग्समध्ये जाऊन सुरू करण्याची गरज होती. हा पर्याय सुरू केल्यानंतर क्रोम ब्राऊजर धोकादायक वेबसाईट्सना ब्लॉक करत होतं. वीक, स्ट्राँग, कम्प्रोमाईज्ड वेबसाईट, एक्स्टेन्शन अशा गोष्टींची माहिती याठिकाणी मिळत होती.

हॅकर्सपासून (Hackers) बचावासाठी देखील हे फीचर काम करतं. तुम्हाला ते वेळोवेळी पासवर्ड अपडेट करण्याची आठवण देखील करुन देतं. गुगल क्रोमच्या नव्या अपडेटनंतर (Google Chrome Update) आता हे सेफ्टी फीचर बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिकली सुरू राहणार आहे. म्हणजेच, तुम्हाला वेगळं सुरू करण्याची गरज नाही.

लवकरच येणार नवे फीचर्स

गुगल सध्या वेगाने नवनवीन फीचर्सवर काम करत आहे. लवकरच यूजर्स ग्रुप केलेल्या टॅब्सना सेव्ह करू शकणार आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या डिव्हाईसेसवर काम करणं सोपं होईल. सोबतच गुगलच्या क्रोम ब्राऊजरमध्ये जेमिनी एआयचे (Gemini AI) फीचर्सही लवकरच येणार आहेत, असं कंपनीच्या सीईओंनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : 'युती फक्त राज्यात' म्हणत पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT