Google DeepMind CEO Warn about AI Job Risk esakal
विज्ञान-तंत्र

AI Jobs : युवकांनो सावध व्हा! 5 वर्षात AIमुळे नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार; आत्ताच शिकून घ्या 'ही' कौशल्ये, गुगल सीईओने केले सतर्क

Google DeepMind CEO Warn about AI Job Risk : गुगल डीपमाइंडचे CEO डेमिस हासाबिस यांनी पुढील ५ वर्षांत एआयमुळे नोकऱ्यांमध्ये मोठा बदल होणार असून तरुणांनी आता पासून एआयमध्ये कौशल्य विकसित करून स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन केले आहे

Saisimran Ghashi

AI Job Risk : जग झपाट्याने कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) वाटचाल करत असताना, Google DeepMind चे CEO डेमिस हासाबिस यांनी तरुणांना सतर्क करत स्पष्ट इशारा दिला आहे . ते म्हणाले "एआय ही तुमच्या पिढीची निर्णायक क्रांती ठरणार आहे, त्यामुळे आत्ताच यात पारंगत व्हा, अन्यथा मागे पडाल!"

डेमिस हासाबिस हे Google DeepMind या गुगलच्या अत्याधुनिक संशोधन संस्थेचे प्रमुख आहेत. याच संस्थेमार्फत कंपनीचे जनरेटिव एआय मॉडेल ‘Gemini’ आणि AGI (Artificial General Intelligence) च्या दिशेने संशोधन सुरू आहे एक अशी प्रणाली जी मानवी स्तरावरील विचारशक्ती गाठण्याच्या प्रयत्नात आहे.

अलीकडील Google I/O परिषदेत बोलताना आणि “Hard Fork” या लोकप्रिय पॉडकास्टवर संवाद साधताना हासाबिस म्हणाले की, पुढील ५ ते १० वर्षांत एआयमुळे पारंपरिक नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहेत. मात्र त्याचवेळी नवीन, अधिक मूल्यवान व रंजक संधीही निर्माण होतील.

“इंटरनेटने जशी मिलेनियल्स पिढी घडवली आणि स्मार्टफोनने Gen Z, तसंच जनरेटिव एआय ही Gen Alpha ची ओळख ठरणार आहे,” असे हासाबिस यांनी स्पष्ट केले. त्यांनी युवकांना ‘AI निंजा’ बनण्याचा सल्ला दिला म्हणजेच केवळ वापरकर्ता नाही, तर एआयचे सखोल ज्ञान असलेले कुशल व्यक्तिमत्त्व.

त्यांनी विद्यार्थ्यांना STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) विषयांची भक्कम पायाभूत तयारी करण्याचा सल्ला दिला, परंतु फक्त तांत्रिक कौशल्यांवर भर न देता, सर्जनशीलता, जुळवून घेण्याची क्षमता आणि मानसिक लवचिकता यासारख्या ‘मेटा स्किल्स’ विकसित करण्याचेही महत्त्व अधोरेखित केले.

"शिकण्याची पद्धत शिकणे" ही सर्वांत मौल्यवान गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तंत्रज्ञानाचा वेग पाहता, अनेक कौशल्ये AI कडून अधिक प्रभावीपणे पार पडली जात आहेत. त्यामुळे हासाबिस यांनी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापलीकडे जाऊन स्वतःचे ज्ञान वाढवण्याचे आणि नवनवीन टूल्सवर प्रयोग करण्याचे आवाहन केले.

त्यांचा मेसेज स्पष्ट आहे AI ही केवळ भविष्यातील बाब नाही, ती आधीच आपल्या वर्तमानात आली आहे. आणि ज्या तरुणांनी याचा वेळीच स्वीकार केला, त्यांच्यासाठीच उद्याचे जग अधिक संधींनी भरलेले असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

SCROLL FOR NEXT