Google Family Link Esakal
विज्ञान-तंत्र

Google Family Link : मुलांना स्मार्टफोन द्यायला भीती वाटतेय? आता चिंता सोडा! गुगलचं हे फीचर ठरेल फायद्याचं

यामुळे तुमचं मूल स्मार्टफोनवर काय करतंय यावर तुमचं नियंत्रण आणि लक्ष राहणार आहे.

Sudesh

आजकाल स्मार्टफोन ही अगदी गरजेची गोष्ट झाली आहे. शाळा ऑफलाईन झाल्या असल्या, तरी कित्येक क्लासेस ऑनलाईन होत आहेत. तसंच सुरक्षेच्या कारणामुळेही आपल्या लहान मुलांकडे स्मार्टफोन देण्याची गरज भासते. मात्र या मोबाईलचा मुलं कसा वापर करतील, त्यातून त्यांना काही धोका तर नाही ना याची चिंता पालकांना असते.

तुम्हालादेखील अशीच चिंता असेल, तर गुगलचं एक फीचर तुमची भरपूर मदत करू शकतं. यामुळे तुमचं मूल स्मार्टफोनवर काय करतंय यावर तुमचं नियंत्रण आणि लक्ष राहणार आहे. गुगल फॅमिली लिंक असं या फीचरचं नाव आहे.

असा करा वापर

गुगलची ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या आणि मुलांच्या फोनमध्ये Google Family Link हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही मुलांच्या वापरासाठी ठराविक नियम लागू करू शकता. तसंच मुलं किती वेळ मोबाईल वापरतील हेदेखील तुम्ही निश्चित करू शकता.

वयानुसार निवडा कंटेंट

मुलं मोबाईल वापरणार म्हणजे इंटरनेट तर उघडणारच. इंटरनेटवरील आक्षेपार्ह गोष्टी आपल्या मुलांपासून दूर ठेवण्यासाठी देखील तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने सेटिंग करू शकता.

मुलांच्या वयानुसार योग्य असणारा कंटेंटच त्याला दिसेल, अशी सेटिंग या अ‍ॅपमध्ये करता येते. म्हणजेच, एकदा तुम्ही या अ‍ॅपमध्ये मुलाचं वय निश्चित केलं, की त्या फोनमध्ये गुगलवर त्या वयाशी अनुसरुन सर्च रिझल्ट दिसेल.

मुलांची लोकेशन कळेल

गुगल फॅमिली लिंक या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही मुलांच्या स्मार्टफोनची लोकेशन तपासू शकता. म्हणजेच, मुलं घराबाहेर असतानाही ती कुठे जात आहेत याकडे तुमचं लक्ष राहील. एवढंच नाही, तर तुमच्या मुलांच्या फोनमध्ये किती चार्जिंग शिल्लक आहे हेदेखील तुम्हाला कळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe यांची बदली का रखडली? पडद्यामागे काय घडतंय? नाशिक कुंभमेळ्याशी काय संबंध अन् सरकारमधील कोणाचा विरोध?

LPG Eligibility Rules : ५ किलोचा 'छोटू' गॅस सिलिंडर फक्त 'या' लोकांनाच मिळणार; जाणून घ्या काय आहे नियम?

Pune News: नदी प्रदूषणमुक्तीसाठी काम करा; पुण्यातील बैठकीत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश,‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापनचा निर्णय..

Atpadi Crime: लग्नं केली चार; दागिन्यांसह वधू पसार, आटपाडीत टोळी जेरबंद; लग्नाच्या आमिषाने लुबाडणूक, पाचव्या लग्न अन् काय घडलं..

Kolhapur Crime: भाताच्या कोंड्यात लपवले एक कोटीचे मद्य; तेराशे बॉक्स जप्त, पंजाबकडे जाणारा ट्रक पकडला, दोघे अटक

SCROLL FOR NEXT