Google Location Tracking Fine eSakal
विज्ञान-तंत्र

Google Fined : गुगलला दणका! परवानगी नाकारूनही केलं यूजर्सचं लोकेशन ट्रॅक; आता बसला 7,000 कोटींचा दंड

Google Location Tracking : कॅलिफोर्नियामध्ये गुगल विरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

Sudesh

गुगल हे नेहमीच आपल्या यूजर्सची लोकेशन ट्रॅक करत असतं. भले मग तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल, किंवा कम्प्युटरवर गुगल वापरत असाल. तुमची लोकेशन अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी गुगल मागतंच. कित्येक वेळा यूजर्स ही परवानगी नाकारतात.

जेव्हा आपण गुगलला लोकेशन अ‍ॅक्सेसची परवानगी नाकारतो, तेव्हा गुगलने आपल्या लोकेशनचा डेटा ट्रॅक न करणं अपेक्षित आहे. मात्र, गुगलने याबाबत आपल्या यूजर्सची फसवणूक केल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आली आहे. यासाठी कोर्टाने गुगलला तब्बल 93 मिलियन डॉलर्स, म्हणजे सुमारे 7,000 कोटी रुपये दंड ठोठावला आहे.

कॅलिफोर्नियाचे अ‍ॅटॉर्नी जनरल रॉब बोंटा यांनी हा खटला दाखल केला होता. यूजर्सना आपल्या लोकेशन डेटावर कंट्रोल असल्याचं भासवून गुगलने आपल्या यूजर्सची दिशाभूल केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. गुगल यूजर्सची लोकेशन कधी आणि कशा प्रकारे ट्रॅक करतं, त्यातील कोणती आणि किती माहिती सेव्ह केली जाते; याबाबत कंपनीने ग्राहकांची दिशाभूल केली आहे.

गुगलने फेटाळले आरोप

गुगलने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, तडजोड म्हणून कंपनी 93 मिलियन दंड देण्यास तयार झाली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण जुन्या प्रॉडक्ट पॉलिसीबाबत होतं, ज्यांना गुगलने आता अपडेट केलं आहे; असं गुगलचे प्रवक्ता जोस कास्टानेडा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT