Google India esakal
विज्ञान-तंत्र

Google India : दिवाळीच्या तोंडावर गूगलकडून भारतीयांसाठी मोठं गिफ्ट, आता Google Pay वर मिळणार लोन

यूजर्स या लोनचा फायदा Google Pay च्या मदतीने घेऊ शकतात. याबाबत सविस्तर जाणून घेऊया

साक्षी राऊत

दिवाळीच्या तोंडावर गूगलकडून भारतीयांसाठी मोठं गिफ्ट!

Google India : गूगल फॉर इंडिया कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या कंपनीने भारतात पिक्सेल फोन्सची मॅन्युफॅक्चरिंग ते छोट्या मोठ्या लोन्सपर्यंतच्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने या छोट्या लोन्सना 'सॅशे लोन' असे नाव दिले आहे. यूजर्स या लोनचा फायदा Google Pay च्या मदतीने घेऊ शकतात. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

गूगल इंडियाने ही सर्व्हिस लाँच करताना असे सांगितले होते की, भारतात छोटेखानी व्यवसायिकांना वेळोवेळी अशा लोनची गरज पडते. त्यासाठी कंपनी सॅशे लोन लाँच करणार आहे. याअंतर्गत कंपनी १५ हजार रूपयांपर्यंतचे लोन देते. ज्याची इएमआय फक्त १११ रुपयांपासून सुरु होईल.

बाजारात अनेक फेक लोन अॅप्स आहेत. त्यावर आता गूगलच्या या घोषणेनंतर आळा घाळण्यास मदत होईल. असे अॅप्स बेकायदेशीरपणे लोन देतात आणि नंतर वसूली करतात.

गूगलच्या या सर्व्हिस अंतर्गत लोकांना अधिकृतपणे पैसे मिळतील. कंपनी हे लोन त्यांच्याकडून थेट ग्राहकांना देणार नाही. तर कंपनी यात एक माध्यम म्हणून काम करेल.

बँकसोबत पार्टनरशिप

कंपनीने DMI फायनांससोबत पार्टनरशिप केली आहे. यासोबतच Google Pay ने एक क्रेडिट लाइनसुद्धा इनेबल केली आहे, जी व्यापाऱ्याची मदत करेल. यासाठी कंपनीने ePayLater सोबत पार्टनरशिप केली आहे. व्यापारी सगळ्याच ऑनलाइन आणि ऑफलाइन डिस्ट्रीब्यूटरसाठी याचा वापर करून स्टॉक आणि सप्लाय विकत घेऊ शकतात.

गूगल इंडियाने UPI वर क्रेडिट लाइन फिचरला ICICI बँकेसह लाँच केले आहे. कंपनीने Axis Bank सह पार्टनरशिपसुद्धा केली आहे. यूजर्स या सगळ्या सुविधांचा लाभ Google Pay च्या मदतीने करू शकतात.

Google For India मध्ये कंपनीने घोषणा केली आहे की भारतात Pixel चे उत्पादन सुरु केले आहे. याअंतर्गत कंपनी सगळ्यात आधी Pixel 8 ला भारतात असेंबल करेल. फोनच्या किमतीबाबत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT