google map plus code feature help users to save share their locations plus codes check benefits 
विज्ञान-तंत्र

गुगल मॅप्सचे Plus code फीचर; तयार करता येईल डिजीटल पत्ता, वाचा फायदे

सकाळ डिजिटल टीम

Google Maps Plus Code Feature : Google India ने एक मोठी घोषणा केली असून कंपनीने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. गुगल मॅप्सचे (Google Maps) हे नवीन फीचर प्लस कोड (Plus Code) च्या मदतीने यूजर्स त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता (Digital Address) तयार करू शकतील. ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती तुमच्या अचूक लोकेशनपर्यंत पोहोचू शकेल. हे सध्याच्या पिन कोडप्रमाणे काम करेल. म्हणजे तुमच्या पत्त्याला एक डिजिटल कोड नंबर दिला जाईल. हे फिजीकल पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. याद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुमच्या पत्त्यावर अचूक पोहोचता येईल.

डिजिटल पत्त्यावर लोकांची नावे, परिसर आणि घर क्रमांक आवश्यक नाहीत. डिजिटल अॅड्रेस कोड असलेला हा प्लस कोड हे अक्षांश आणि रेखांशावर आधारित असतील आणि संख्या आणि अक्षरे एक लहानसा कोड असेल. यामुळे तुमचा पत्ता तुमच्या दारापर्यंत अचूक दाखवता येईल. प्लस कोडमुळे एखादे दुकान शोधणे आणि नेव्हिगेशन सोपे होते.

डिजिटल पत्त्यामध्ये काय वेगळे असेल

डिजिटल अॅड्रेस कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची स्वतंत्र ओळख तयार केली जाईल. आणि पत्ताजियोस्पेशियल कोऑर्डिनेट्स (geospatial coordinates) जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा पत्ता नेहमी रस्त्यावर किंवा शेजारून नव्हे तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो. हा कोड कायमस्वरूपी कोड असेल.

काय फायदा होईल

  1. डिजिटल पत्त्यासह, तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा फिजीकल पत्ता कोणाशीही शेअर करावा लागणार नाही.

  2. यामुळे ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी कंपन्यांना माल पोहोचवणे सोपे होईल.

  3. डिजिटल कोड असलेला प्लस कोडमुळे जेवण, औषध किंवा पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT