Google Map Colours Meaning esakal
विज्ञान-तंत्र

Google Map Colours : गुगल मॅपचे रंग शोभेचे नाहीत! रंगाचा खरा अर्थ माहितीये? वाचा तुमच्या कामाची गोष्ट

Google Map Colours Meaning : गुगल मॅपवर दाखवले जाणारे रंग रस्त्यांची स्थिती आणि ट्रॅफिकविषयी महत्त्वाची माहिती देतात. हे रंग समजून घेतल्यास तुमचा प्रवास अधिक सुकर, वेगवान आणि स्मार्ट होईल.

Saisimran Ghashi

Google Map Colours Meaning : स्मार्टफोन युगात Google Maps हे एक महत्वाचे साधन बनले आहे. प्रवास करताना रस्ता चुकू नये, ट्रॅफिक टळावा किंवा योग्य मार्ग निवडावा यासाठी आपण हे अ‍ॅप सतत वापरतो. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की Google Maps वर हिरवे, लाल, पिवळे, निळे, जांभळे आणि तपकिरी रंगाचे रस्ते दाखवले जातात? हे रंग फक्त डिझाईनसाठी नसून प्रवासाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात. जाणून घ्या या प्रत्येक रंगामागचं खरं गुपित!

हिरवा रंग

हिरवा रंग म्हणजे रस्ता मोकळा आहे. ट्रॅफिक नाही, थांबावं लागणार नाही म्हणजे प्रवास झटपट आणि आरामात होणार.

पिवळा किंवा केशरी रंग

हा रंग दाखवत असेल, तर समजून घ्या की थोडी वाहतूक आहे, पण फारसा उशीर होणार नाही. अजूनही हा मार्ग निवडणं ठीकच आहे.

लाल रंग

लाल रंग दिसत असेल, तर तिथे घनदाट वाहतूक आहे. जर रंग अधिक गडद किंवा जाड असेल, तर ते ट्रॅफिक जॅम सूचित करतं. घाईत असाल, तर दुसरा मार्ग शोधा.

निळा रंग

प्रवास सुरू करताना जो निळा रस्ता दिसतो, तो म्हणजे तुमच्या मूळ ठिकाणापासून जिथे जायचे आहे त्या ठिकाणापर्यंतचा सुचवलेला मार्ग. तो नेहमी सर्वात अचूक आणि सोपा असतो.

जांभळा रंग

कधी कधी Google Maps एक जांभळा रंगाचा पर्यायी मार्ग दाखवतो. यात थोडी वाहतूक असू शकते, पण मुख्य मार्गावर अधिक ट्रॅफिक असेल, तेव्हा हा चांगला पर्याय ठरतो.

तपकिरी रंग

तपकिरी रंग असेल, तर तो डोंगराळ भाग दाखवतो. विशेषतः ग्रामीण किंवा घाट भागातील प्रवासासाठी हा इशारा फायद्याचा ठरतो.

या रंगांची माहिती का महत्त्वाची आहे?

या रंगांच्या अर्थांची माहिती असल्यास, तुम्ही वेळ वाचवू शकता, ट्रॅफिक टाळू शकता आणि प्रवासात लवकर निर्णय घेऊ शकता. पुढच्या वेळेस Google Maps उघडताना लक्षात ठेवा. हे रंग केवळ असेच दिलेले नाहीत, ते तुमचे ट्रॅव्हल असिस्टंट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT