Google Maps  
विज्ञान-तंत्र

Google Maps फक्त रस्ते सांगत नाही, जाणून घ्या इतरही भन्नाट फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

हिवाळाच्या दिवसात आपल्यापैकी बरेच जण दूर कुठेतरी फिरायला जण्याचे प्लॅन बनवतात, तुम्ही देखील कुठेतरी सहलीला जात असाल आणि तुम्हाला तिकडच्या रस्त्यांची माहिती नसेल तर तुम्ही गुगल मॅपची (Google Maps) मदत घेऊ शकता. पूर्वी Google मॅप्स फक्त डायरेक्शन शोधण्यासाठी वापरले जात असे, परंतु आता ते लोकांचा प्रवास करण्यासाठी एक संपूर्ण पॅकेज ऑफर करते. तुम्ही मोठ्या मॉलमध्ये स्टोअर शोधण्यापासून ते तुमच्या फ्लाइटची वेळ पाहणे, हॉटेल, कार रेंटल इतकेच नाही तर रेस्टॉरंट मध्ये टेबल प्री-बुकिंगपर्यंत सर्व काही याच्या मदतीने करू शकता. आज आपण काही गुगल मॅपच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे सुट्टी अगदी मजेत घालवता येईल.

हॉलिडे पॅकेजे ट्रॅक करा

प्रवास करताना तुमच्या सर्व बुकिंग ट्रॅक करणे अवघड जाते. अशा परिस्थितीत, तुमच्या ईमेलणध्ये ते शोधत बसणे तीतकेच त्रासदायक ठरते. पण Google Maps तुमच्या प्रवासाचे चार्ट बनवू शकते. ज्याच्या मदतीने तुम्ही वेळ वाचवण्यासाठी हॉलिडे फ्लाइट बुकिंग, हॉटेल, रेंटल कार आणि रेस्टॉरंट बुकिंग लगेच चेक करता येतील आणि तुम्ही फक्त सुट्टीचा आनंद लुटणे यावर लक्ष केंद्रीत करु शकाल.

तुमचे पुढील रिझर्व्हेशन्स देखील तपासा

यासाठी तुम्हाला प्रथम गुगल मॅपवर जावे लागेल. त्यानंतर तळाशी असलेल्या मेनू रोमधील सेव्ह्ड ऑप्शनवर टॅप करा.

नंतर रिझर्व्हेशन्सवर क्लिक करा, जिथे तुम्हाला तुमच्या सर्व आगामी रिझर्व्हेशन्सची लिस्ट दिसेल जी Maps ने Gmail वरून काढलेली असेल.

तुम्ही रिझर्व्हेशन्स पैकी एकावर क्लिक केल्यास, तुम्हाला त्याची तारीख आणि लोकेशन इत्यादी बद्दल अधिक जाणून घेता येईल.

याशिवाय, सोपी पध्दत म्हणजे तुम्ही थेट Google Maps च्या सर्च बॉक्समध्ये 'My Reservation' शोधू शकता.

गुगल मॅप्समध्ये रेस्टॉरंट टेबल बुक करा

आता तुम्ही Google Maps वरुन देखील रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करु शकता, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मॅपवर जावे लागेल. त्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंट्स पर्यायावर टॅप करा आणि तुम्हाला जवळपासच्या सर्व ठिकाणांची यादी दिसेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार रेस्टॉरंटची निवड करावी लागेल. त्यानंतर टेबल रिझर्व करण्याचा पॉप अप ऑप्शन स्क्रीनवर दिसेल. आपण जेवणासाठी सर्वोत्तम ठिकाणे व त्यांची माहिती देखील येथे शोधू शकता.

गुगल मॅप्सने नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, सर्व विमानतळ, मॉल आणि ट्रांसपोर्ट स्टेशन्स गुगल मॅपमध्ये जोडण्यासाठी डायरेक्टरी पेजचा विस्तार होईल. यामुळे विमानतळाभोवती जेवण्याची ठिकाणे शोधण्यात किंवा फ्लाइटच्या आधी खरेदी करताना तुमचा वेळ वाचवेल. Google Maps तुम्हाला तुमच्या आवडीचे ठिकाण कोणत्या मजल्यावर आहे ते दाखवेल आणि ते स्टोअर किती वेळ उघडे असते ते देखील पाहाता येईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढील बुकिंगबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आणी तुमचा चांगले रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग मॉल्स शोधण्यात वेळ जाणार नाही त्यामुळे तुम्हाला सुट्टीचा पुरेपुर आनंद घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT