Google Maps Bharat eSakal
विज्ञान-तंत्र

Google Bharat : आता गुगल मॅप्सवर 'इंडिया' सोबत दिसतंय 'भारत' नाव; इतर सेवांमध्येही जोडली दोन्ही नावं

India Vs Bharat : इंडिया नावाऐवजी भारत हे नाव वापरण्याच्या अघोषित मोहिमेत आता गुगलनेही उडी घेतली आहे.

Sudesh

इंडिया नावाऐवजी भारत हे नाव वापरण्याच्या अघोषित मोहिमेत आता गुगलनेही उडी घेतली आहे. गुगल मॅप्सवर तुम्ही आता आपल्या देशाचं नाव सर्च केल्यास, त्याठिकाणी 'Bharat' अशा नावासह आपला तिरंगा दिसत आहे. अर्थात, यासाठी तुम्हाला सर्चदेखील भारत याच नावाने करावे लागणार आहे.

गुगल मॅप्सच्या हिंदी व्हर्जनमध्ये देखील देवनागरी लिपीमध्ये 'भारत' लिहिलेलं दिसून येत आहे. तर, तुम्ही इंग्लिश व्हर्जनमध्ये इंडिया असं सर्च केलं, तर त्याठिकाणी 'India' असंच नाव दिसत आहे. या सर्व नावांसोबत 'कंट्री इन साउथ एशिया' असं एकाच प्रकारचं डिस्क्रिप्शन दिसत आहे.

गुगलच्या इतर प्रॉडक्ट्समध्येही बदल

केवळ मॅप्स नाही, तर गुगलच्या इतर सेवांमध्येही इंडिया आणि भारत असे दोन्ही पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुगलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी सर्च रिझल्टमध्ये हे दिसून येत आहे.

इंग्रजीमध्ये दोन्ही पर्याय उपलब्ध असले, तरी हिंदीमध्ये सर्च केल्यास बहुतांश ठिकाणी गुगल 'भारत' याच नावाला प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये India च्या हिंदी ट्रान्सलेशनसाठी भारत, हिंदुस्तान, भारतवर्ष असे पर्याय दिसत आहेत.

जी-20 परिषदेपासूनच केंद्र सरकार बहुतांश ठिकाणी 'इंडिया' नावाऐवजी भारत नाव वापरण्याला प्राधान्य देत आहे. यातच रेल्वे मंत्रालयाने देखील आपल्या एका प्रपोजलमध्ये इंडिया ऐवजी भारत नाव वापरल्याचं वृत्त शनिवारी माध्यमांमध्ये आलं होतं. त्यानंतर आता गुगलने केलेला हा बदल पाहून सगळीकडून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT