Blue Tick  sakal
विज्ञान-तंत्र

Blue Tick : अरेच्चा! आता गुगलवरही मिळणार ब्लू टिक

गुगलने ईमेल या खास सेवेसाठी ब्लू टिक ठेवण्याची घोषणा केली आहे.

निकिता जंगले

Blue Tick : मागील काही काळापासून ब्लू टिकची बरीच चर्चा रंगली. ब्लू टिक वरुन ट्वीटरवर बराच गोंधळ पाहायला मिळाला. एवढंच काय तर ब्लू टिक मिळवण्यासाठी पैसे सुद्धा मोजावे लागणार असल्याचे नवे धोरण ट्वीटरने आणले. आता ब्लू टिक संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ट्विटरनंतर आता गुगलनेही ब्लू टिक देण्याचा विचार केलाय. गुगलने जीमेल या खास सेवेसाठी ब्लू टिक ठेवण्याची घोषणा केली आहे. (google new blue tick feature on Gmail coming)

ईमेलवर ओळख पटण्यासाठी आणि स्पॅम आणि फ्रॉड जीमेलद्वारे फसवणूक टाळण्यासाठी गुगलने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही एक मोठी अपडेट जीमेलमध्ये करण्यात येणार आहे.

यापूर्वी 2021 मध्ये गुगलने Gmail मध्ये ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन हे नवं फिचर आणलं होतं. या फीचरद्वारे इमेलसोबत त्या बँडचा लोगोही दिसायला लागला आता आणखी सुरक्षित ईमेल सेवा व्हावी, यासाठी ब्लू टिकची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन या फिचरमुळे ज्या कंपनीच्या बँडचे लोगो मेलसोबत दिसत आहे त्यांना हे ब्लू टिक आपोआप लागू होणार.

इलॉन मस्कने ट्वीटरवर पेड ब्लू टिकची संकल्पना आणल्यानंतर आता गुगलची कंपनी मेटा सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेड-आधारित व्हेरिफिकेशनसाठी टेस्टींग करत आहे. त्यात या गुगलच्या जीमेलवर येणाऱ्या ब्लु टिकच्या घोषणेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT