google-new-feature 
विज्ञान-तंत्र

‘गुगल’चे नवे फिचर लाँच ; खासगी फाइल ठेवा ‘सेफ फोल्डर’मध्ये 

वृत्तसंस्था

माउंटन व्ह्यू (अमेरिका) - मोबाईलमधील आपल्या खासगी फाइल ॲपमध्ये एका स्वतंत्र, पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये ठेवता येणार आहेत. गुगल कंपनीने यासाठी ‘सेफ फोल्डर’ हे नवीन फिचर लाँच केले आहे. यामुळे युजरला कोणतेही डॉक्युमेंट, फाइल किंवा मीडिया फाइल ॲपमधील सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल. हे ‘सेफ फोल्डर’ चार आकडी पिन क्रमांकाने सुरक्षित करण्यात आले आहे. हे फिचर सध्या ‘गुगल फाइल्स’साठी बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून लवकरच ते इतरांसाठीही उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

गुगलने ब्लॉगद्वारे ‘सेफ फोल्डर’ या ॲपची घोषणा केली. आपला मोबाईल घरातील इतर व्यक्तीही आणि मित्र-मैत्रिणीही सहज हाताळत असतात. लहान मुलांकडेही मोबाईल जातो. ही बाब सर्वसाधारण असली तरी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे किंवा कामासंदर्भात काही गोपनीय छायाचित्रे, कागदपत्रे असल्यास त्या इतरांकडून चुकून डिलीट होण्याचा अथवा त्याचा गैरवापर होण्याचा संभव असतो. ‘गुगल फाइल्स’मधील ‘सेफ फोल्डर’ हे फिचर तुमची वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवते. 

अनधिकृत ॲक्सेस नाही 
‘सेफ फोल्डर’मध्ये तुमच्या इमेज, व्हिडिओ, ऑडिओ फाइल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे इतरांपासून सुरक्षित ठेवली जातात. तुम्ही ॲपमधून बाहेर पडताच ते आपोआप लॉक होते. चार आकडी पिन क्रमांकाशिवाय ते ओपन होत नाही. यामुळे तुमचा मोबाईल घेऊन कोणीही हे ॲप उघडू शकत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT