Google ने आपल्या Pixel 9 सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Pixel 9a भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. Flipkart वरून विक्रीसाठी उपलब्ध असलेला हा फोन आकर्षक डिझाईन, दमदार फीचर्स आणि भन्नाट ऑफर्ससह येतो. खास म्हणजे ज्यांच्याकडे जुना Pixel 6a आहे त्यांना नवीन Pixel 9a केवळ 30,500 रुपायांमध्ये मिळू शकतो.
Pixel 9a हा फोन Iris, Obsidian आणि Porcelain या तीन स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट आहे.
डिस्प्ले: 6.3-इंचाचा Actua डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,700 निट्स पीक ब्राइटनेस
प्रोसेसर: नवीन Tensor G4 प्रोसेसर
बॅटरी: 5,100mAh क्षमतेची मोठी बॅटरी, 23W वायर्ड आणि Qi वायरलेस चार्जिंग
कॅमेरा: 48MP + 13MP ड्युअल रिअर कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरा आणि नवीन Macro Focus फिचर
ऑपरेटिंग सिस्टिम: Android 15 सह 7 वर्षांची अपडेट्सची खात्री
ड्युराबिलिटी: IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट
Pixel 9a ची अधिकृत किंमत 49,999 असून, Flipkart वर HDFC बँकेच्या कार्ड्सवर 3,000 रुपये पर्यंतची सूट दिली जात आहे. यासोबतच जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 48,230 रुपये पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
विशेषतः Pixel 6a असणाऱ्यांना त्यांच्या मोबाईलच्या स्थितीवर अवलंबून 16,880 रुपयेपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळून नवीन Pixel 9a फक्त 30,500 रुपयांमध्ये मिळू शकतो.
तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर Google Pixel 9a एक उत्तम पर्याय ठरू शकतो. खासकरून जर तुमच्याकडे Pixel 6a असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.