Google Hangout
Google Hangout 
विज्ञान-तंत्र

आता Hangouts होणार गायब, चॅटिंगसाठी Googleचं नव अ‍ॅप येणार

सकाळ डिजिटल टीम

सन २०१३मध्ये Google सोशल मिडिया सर्व्हिस Google+ चॅटिंगचे फिचर म्हणून वापरली जाणारी Google Hangoutsची सेवा लवकरच सेवा बंद केली जात आहे. Google वर्कस्पेस यूजर्ससाठी डीफॉल्ट मेसेजिंग अ‍ॅप Google Chat याची जागा घेईल. आणि त्यासंबधीत नवे बदल केले जात आहे. नवीन चॅट सेवा स्विच करण्यासाठी पहिल्यांदा Google Hangoutsची पुर्णपण बंद करावी लागते. आता हँग आऊट्स अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमधून हटविले आहे.

जुने Google अ‍ॅप लिस्टिंग मधून काढले

9to5Google नुसार, Google Hangouts अ‍ॅप Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींवरून हटवण्यात आले आहे. याचा अर्थ नवीन यूजर्स हे जुने अ‍ॅप वापरू शकणार नाहीत आणि ते iOS किंवा Android डिव्हाइसमध्ये इंस्टॉल केले जाऊ शकणार नाहीत. Google ने नोव्हेंबर 2018 मध्ये घोषणा केली की, Google Chat सेवा हळूहळू Hangouts ची जागा घेईल. कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये वर्कस्पेस यूजर्स Hangouts वरून Meet वर स्विच करण्यास सुरुवात केली

आधी इंस्टॉल केलेले अ‍ॅप नाही

ज्या युजप्सने त्यांच्या Android फोनवर कधी Hangouts अ‍ॅप इंस्टॉल केले असेल तर ते Google Play मध्ये दिसू शकतात. यूजर्सला आपल्या प्रोफाईल फोटोवर टॅप केल्यानंतर मॅनेज अ‍ॅप्स अ‍ॅन्ड डिव्हाईसमध्ये मॅनेज आणि नॉट इन्स्टॉल अ‍ॅपवर क्लिक करावे लागेल. थर्ड-पार्टी स्टोर्स पर देखील Hangouts अ‍ॅप अस्तित्वात आहे आणि या क्षणी ते कसे कार्य करते यावर कोणताही प्रभाव पडलेला नाही. पण लवकरच Google लवकरच त्याचा प्रवेश पूर्णपणे डिसेबल करू शकते.

जुने Hangouts चॅट हिस्ट्री डिलिट होणार नाही

Google चॅटशी संबंधित बदलांसह जुन्या Hangouts चॅट हटवल्या जाणार नाहीत. कंपनीने म्हटले आहे की, काही प्रकरणे वगळता सर्व यूजर्स जुन्या Hangouts चॅट हिस्ट्री Google Chat वर ट्रान्सफर केली जाईल. पण यूजर्सला नवीन प्लॅटफॉर्म करावा यासाठी Google Chat मध्ये मिळणारे कोणतीही नवीन फिचर Hangouts उपलब्ध नाही. Google Chat सेवा रेग्युलर आणि पेड यूजर्ससाठी उपलब्ध असेल.

Hangouts

व्हिडिओ कॉलिंगसाठी Meet सेवा

Ars Technica चे Rom Amadio ने 9to5Google च्यामाहितीनुसार अहवालात म्हटले आहे की, Google Chat चे व्हिडिओ कॉलिंग फीचर पूर्णपणे Google Meet वर अवलंबून आहे. नवीन मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूजर्सला थेट व्हिडिओ कॉल करण्याऐवजी 'व्हिडिओ मीटिंग'ची URL पेस्ट करण्याची परवानगी देते, ज्यामुळे दोन यूजर्स कनेक्ट होऊ शकते. आतापर्यंत, व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय हँगआउट्समध्ये उपलब्ध होता आणि यूजर्स थेट वन टू वन व्हिडिओ कॉल करू शकत होते.

यापूर्वी Google Talk चॅट सेवा बंद करण्यात आली होती

गुगलचा चॅटिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अनुभव चांगला राहिला नाही. Google Orkut आणि Google+ सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेल्या दोन दशकात आले आणि गेले. 2005 मध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस चॅटिंगसाठी Google Talkची सेवा सुरू करण्यात आली होती, परंतु 2017 मध्ये ती बंद करण्यात आली होती. आता कंपनी विद्यमान सेवा एकत्रित करून यूजर्सना चांगले पर्याय देऊ इच्छित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT