Google search 
विज्ञान-तंत्र

गुगल सर्चिंगबाबत 'ही' चूक करत असाल तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेलं..

Google अगदी काही वेळा त्या गोष्टीची माहिती देतं.

सकाळ डिजिटल टीम

आजच्या डिजिटल आणि इंटरनेटच्या जगात (Google) गुगलचा वापर सतत वाढत आहे. कोणतीही अगजी छोटीसी गोष्ट सर्च करायची असेल तरी आपण लगेच Google करतो. कित्येक लोक रोज अनेक गोष्टी यावर शोधत असतात. आपल्यालाही बऱ्याच गोष्टी माहित नसतात. त्या आपण सहजरित्या Google वर शोधू शकतो. Google अगदी काही वेळा त्या गोष्टीची माहिती देतं. त्यामुळे आजच्या जगात गुगल अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे म्हटंले तरी वावगे ठरणार नाही.

अनेकांना Google Search बद्दल माहिती नसते. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि तुम्हाला हा पर्याय माहिती नसेल तर हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मात्र याचा वापर करताना काळजी घेतली नाही तर तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. वास्तविक गुगलचे स्वतःचे नियम आणि अटी आहेत. गुगलच्या नियमांच्या विरोधात असे काही तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या लेखात आम्ही तुम्हाला या नियमांबद्दल सांगणार आहोत. त्यांचा शोध घेण्यावर बंदी का घालण्यात आली आहे, हेही जाणून घ्या.

गुगलवर चाइल्ड पॉर्नचा शोध होत असेल तर..

चाइल्ड पॉर्नच्या वाढत्या घटना पाहता भारतातील सरकारने चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत नियम कडक केले आहेत. गुगलवर चाइल्ड पॉर्न शोधणे किंवा पाहणे, त्याच्याशी संबंधित काहीही शेअर करणे हा गुन्हा आहे. तुम्ही यापैकी काहीही करत असल्याचे आढळल्यास, Google च्या नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा हे सर्च केले जात असले तर..

बर्‍याच वेळा असे घडते की, आपण कुठेतरी काहीतरी वाचतो किंवा पाहतो आणि आपण ते Google वर शोधू लागतो. परंतु आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. बॉम्ब कसा बनवावा अशी माहिती गुगलवर टाकली तर ती मिळत नाही. कारण असे काही धोक्याचा आशय असणारी माहिती गुगल ठेवत नाही. त्यामुळे या प्रकाराच्या शोधावर सायबर सेलची नेहमीच नजर असते. त्यामुळे अशा गोष्टी गुगलवर शोधणे टाळावे.

Google वर गर्भपात संबंधित शोध

गर्भपाताबाबत भारतात काही कायदेही करण्यात आले आहेत. ज्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही. त्यामुळे गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणेही गुन्हा आहे, त्यासाठी तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT