Google Doodle valentines Day Sakal
विज्ञान-तंत्र

Google Doodle: गुगलचं 'व्हॅलेन्टाईन्स डे' स्पेशल डूडल; आकर्षक 3D कोडं

Google Valentine's Day Doodle : गुगलने 'व्हॅलेन्टाईन डे' निमित्त एक आकर्षक 3D Puzzle डूडल बनवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Valentine's Day 3D Puzzle: गुगल (Google) नेहमीच विविध विषयांवर आकर्षक डूडल्स (Doodle) बनवत असते. विविध गोष्टींचं औचित्य साधून गुगल हे डूडल बनवत असते आणि आज तर व्हॅलेन्टाईन्स डे (Valentines Day) अर्थात प्रेमाचा दिवस आहे. माफ करा, प्रेमाच सण आहे. साहजिकच आजच्या प्रेमाच्या दिवसाच्या निमित्ताने आज एक खास डूडल बनवलं आहे. गुगलने व्हॅलेन्टाईन डे 3D कोडं असलेलं डूडल बनवलं आहे. (Google Valentine's Day Doodle, 3D Puzzle )

"कधीकधी प्रेम तुम्हाला आश्चर्यचकित करते. प्रेम हे अनेक चढउतार आणि वळणांनी भरलेले असते. परंतु एवढे चढ-उतार असूनही ते जगाला जवळ आणू शकते मग ती कोणतीही प्रजाती असो. आजच्या वैशिष्ट्यपूर्ण 3-डी डूडलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण दोन हॅमस्टर्सकडे पहा. तुम्ही त्यांचा मार्ग एकत्र करू शकता का आणि त्यांना एकमेकांच्या भेटण्याचा मार्ग मोकळा करू शकता? ते म्हणत आहेत की, जिथे हृदय असते, तिथे घर असते. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!" असं गुगलने (Google) म्हटलं आहे.

Google व्हॅलेंटाईन डे 3D कोडे मार्गदर्शक-

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नवीन Google 3D हॅमस्टर कोडे ऍक्सेस करायचे असल्यास, तुम्हाला फक्त Google Doodles वर जावं लागेल.

CNET ने दिलेल्या अहवालानुसार गेमचे मेकॅनिक अगदी सोपे आहे. Google Valentine's Doodle लोगो कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त उपलब्ध चारही टूल्स वापरायची आहेत. हे 3D कोडे असल्याने, तुम्ही Google Doodles चे वेगवेगळे अँगल पाहण्यासाठी तुम्ही कर्सरचा वापर करू शकता.

नवीन मिनी-गेम ऑफर करण्याव्यतिरिक्त, Google अधिक ग्राहकांना त्याच्या लोकप्रिय Google Doodle स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. विशेषत: अमेरिकेत राहणाऱ्या K-12 विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगलने प्रोत्साहित करत आहे. यंदाची 2022 ची थीम "I care for myself by..." ही आहे. याचा अर्थ असा आहे की, खडतर काळात सहभागी स्वतःची काळजी कशी घेतात हे दाखवणारे त्यांचे चित्र शेअर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT