1600 Crore passwork leak google shared tips for digital security esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Security : तब्बल 1600 कोटी पासवर्ड अन् ईमेल लीक! गुगलने सांगितली ट्रिक; हॅकिंगपासून स्वतःला सुरक्षित ठेवा एका क्लिकवर..

1600 Crore passwork leak google shared tips for digital security : तब्बल १६०० कोटींपेक्षा अधिक पासवर्ड्स ऑनलाईन लीक झाले असून गुगलने वापरकर्त्यांना तात्काळ सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Saisimran Ghashi

Digital security tips : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. Google, Facebook, Apple, Telegram यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या १६०० कोटींपेक्षा अधिक ईमेल आयडी आणि पासवर्ड्स ऑनलाईन लीक झाल्याचं समोर आलं आहे. या मोठ्या डेटा लीकमुळे कोट्यवधी वापरकर्त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा गंभीरपणे धोक्यात आला आहे

कुठे सापडला लीक डेटा?

सायबरसुरक्षा तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा लीक एका असुरक्षित सर्व्हरवर आढळून आला आहे, जो कोणालाही सहजपणे अ‍ॅक्सेस करता येत होता. यात सरकारी पोर्टल्स, व्हीपीएन लॉगिन्स, बिझनेस ईमेल्स आणि सोशल मीडिया खात्यांची माहिती सुद्धा आहे. विशेष म्हणजे या लीकमध्ये जुने आणि नवीन दोन्ही पासवर्ड्स आहेत, त्यामुळे नुकतेच अपडेट केलेले अकाउंट्स देखील असुरक्षित ठरू शकतात.

२०२५ पासून आतापर्यंतचा डेटा धोक्यात

संशोधकांनी सांगितले की, त्यांनी ३० हून अधिक हॅक झालेल्या डेटाबेसेसचे विश्लेषण केले असून, यामध्ये ३५० कोटींपेक्षा अधिक नोंदी आढळल्या आहेत. ही लीक २०२५ च्या सुरुवातीपासून चालू काळापर्यंतच्या काळातली आहे, त्यामुळे नुकतेच बदललेले पासवर्ड देखील सुरक्षित नाहीत.

गुगलने यासंदर्भात एक तत्काळ सतर्कता सूचना जारी केली असून, वापरकर्त्यांना खालील उपाययोजना करण्यास सांगितले आहे

  • तात्काळ आपले पासवर्ड बदला, विशेषतः Gmail, बँकिंग, सोशल मीडिया खात्यांचे.

  • पासवर्ड मजबूत आणि अवघड ठेवा मोठ्या अक्षरांचा, आकड्यांचा आणि स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर करा.

  • टू स्टेप सुरक्षा (2FA) सुरू करा.

  • Passkey सुविधा अ‍ॅक्टिवेट करा, जी पासवर्ड हल्ल्यांपासून बचाव करते.

  • अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

  • कधीही वैयक्तिक माहिती ईमेलद्वारे किंवा अनवेरिफाईड संदेशांमध्ये शेअर करू नका.

सर्व्हिसेसवर होऊ शकतो मोठा परिणाम

ही लीक फक्त Googleपुरती मर्यादित नाही. Facebook, Apple, Telegram, आणि अनेक कॉर्पोरेट नेटवर्क्स यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेकजण एकाच पासवर्डचा वापर वेगवेगळ्या खात्यांसाठी करतात, त्यामुळे एकाच पासवर्डमधून अनेक खात्यांवर नियंत्रण मिळवणं हॅकर्ससाठी सोपं होऊ शकतं.

आत्ताच करा ही काळजी

जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पासवर्ड अपडेट केला नसेल, तर आजच अपडेट करा.

  • पासवर्ड मॅनेजर वापरा,

  • खात्यांवर नियमित नजर ठेवा,

  • फिशिंग आणि सायबर फ्रॉडबाबत जागरूक रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT