Google Urls  esakal
विज्ञान-तंत्र

Google Urls : आता गूगल बनणार तुमचा ऑनलाइन टीचर! लवकरच येणार हे जबरदस्त फिचर, प्रत्येक चुकीवर देणार अलर्ट

गूगलने आणखी काही एक्सेसिबिलिटी फिचरसुद्धा लाँच केले आहे

साक्षी राऊत

Google Urls : गूगलने 'गूगल क्रोम वेब वर्जन'साठी एक्सेसिबिलिटी फीचर लाँच केले आहे. हे फिचर युआरएलमध्ये होणाऱ्या चुका कमी करण्यास मदत करेल. सध्या हे फिचर अँड्राइड आणि iOS यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. या फिचरचा वापर लर्निंग डिसॉर्डर आणि टायपिंग मिस्टेक्ससाठी होणार. गूगलने आणखी काही एक्सेसिबिलिटी फिचरसुद्धा लाँच केले आहे. जसे की, गूगल मॅप्समध्ये टॅग्जची सुविधा आणि डाउनलोडर स्क्रिन रीडर फिचर.

गूगल कायम प्लॅटफॉर्म यूजर फ्रेंडली करण्याच्या प्रयत्नात असते. जेणेकरून एंड यूजरला गूगलमार्फत चांगला अनुभव घेता यावा. त्यात भर म्हणून गूगलमार्फत गूगल क्रोम वेब वर्जनसाठी एक्सेसिबिलिटी फिचर लाँच करण्यात आले आहे. हे फिचर गूगल क्रोममधील चुका टाळण्याचा पूरेपूर प्रयत्न करेल. लवकरच हे टूल मोबाइल व्हर्जनसाठीसुद्धा लाँच करण्यात येईल असा दावा गूगलने केलाय. सध्या हे फिचर अँड्राइड आणि iOS यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे.

या यूजर्सना होईल फायदा

गूगलने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, हे फिचर त्या लोकांसाठी फायद्याचे असणार आहे जे लर्निंग डिसॉर्डर म्हणजेच dysllexia ला बळी पडतात. या पद्धतीच्या आजाराचा उल्लेख तारे जमी पर या चित्रपटातदेखील करण्यात आलाय. जे यूजर्स घाइत टाइप करताना चुका करतात त्या लोकांसाठी हे फिचर फार कामाचे ठरणार आहे.

हे फिचर टप्प्याटप्यात असणार

हे फिचर Google द्वारे टप्प्याटप्प्याने आणले जाईल. हे फिचर सर्व मोबाइल उपकरणांमध्ये एकाच वेळी आणले जाईल. त्याचप्रमाणे वेबसाइटच्या URL मध्ये एखादी चूक झाल्यास ती चूक होण्याआधीच तुम्हाला अलर्ट येईल. म्हणजे चुकीच्या URL ची समस्या दूर होईल. URL टायपो व्यतिरिक्त, Google द्वारे इतर अनेक फिचर आणली जात आहेत. यात गुगल मॅप एक्सेसिबिलिटी फोकस्ड फीचर आहे.

Google Map मध्ये नवीन एक्ससेसिबिलिटी फिचर

गूगल मॅपमध्ये लवकरच टॅग्ज सुविधा मिळेल. ज्याद्वारे यूजर्सना डिसेबल ओन्ड व्यवसाय ओळखण्यास मदत होईल. हे टॅग LGBTQ+ मालकीचे व्यवसाय दाखवतील. ज्या यूजर्सना ऐकण्यात अडचण येत आहे त्यांच्यासाठी Google मॅप एक मोठा स्क्रीन रीडर वैशिष्ट्य प्रदान करेल. अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी हे फिचर यावर्षी आणले जाईल. याशिवाय व्हील चेअर एक्सेसिबिलिटी आणि ट्रान्झिट नेव्हिगेशनच्या सुविधाही उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Todays Weather Update : नागपूरकरांनी अनुभवली पाच वर्षांतील थंडगार रात्र; पारा प्रथमच ७.६ अंशांवर; विदर्भात आज कसं असेल तापमान?

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

SCROLL FOR NEXT